केज तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा..!* *शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर भारतीय जनता पार्टीचे केज तहसीलदारांना निवेदन..*


 


केज! प्रतिनिधी


 


*केज तालुक्यात कापूस उत्पादक शेतकर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आसून सध्या आठवडी बाजारात व्यापार्यांकडून ४००० ते ४२०० रूपये भावाने कापूस खरेदी केली जात आसून कापूस उत्पादक शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात आर्थीक लूट केली जात आहे.त्यामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे,तसेच संजयगांधी निराधार योजेनेचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत व मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान तात्काळ जमा करावे,तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ खात्यावर जमा करावे आदि मागण्यांसाठीे आज केज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.*


 


केज तालुक्यात शेतकर्यांचे पांढरे सोने म्हणून संबोधले जाणारे कापूस हे पीक शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आसून कापूस उत्पादन येणार्या शेतकर्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे परंतू व्यापार्यांकडून कापूस उत्पादक शेतकर्यांना ४००० ते ४२०० रूपये भाव देऊण लूट केली जात आसून सबंधित शेतकर्यांची लूट थांबवण्यासाठी केज तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.तरी शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून संजयगांधी निराधार योजेनेचे कित्येक प्रकरणे प्रलंबित आसल्याने निराधारांना अनुदान मिळत नसल्याने त्यांची पिळवनूक होत आहे.तसेच प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करून अनुदान जमा करावे.मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या खात्यावर अद्याप पर्यंत नुकसान भरपाईचे अनुदान जमा झालेले नसून सदरील अनुदान तात्काळ शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते नंदकीशोर (काकाजी) मुंदडा यांनी तहसीलदारांकडे केली आहे.यावेळी विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे,तालुकाध्यक्ष भगवान केदार,सभापती विष्णू घुले,वैद्यकिय आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसुदेवराव नेहरकर,सुरेंद्र तपसे,दत्ता धस,संदिप पाटील,अशोक मोराळे,सुनील घोळवे,अनिरुद्ध शिंदे,शिवाजी पाटील,राहुल गदळे,सुरेश नांदे,अंगद मुळे,श्रीकांत भांगे,दिनकर चाटे,शेषेराव कसबे,खदीर कुरेशी,लिंबराज फरके,विक्रम डोईफोडे,सोनू सावंत,मच्छिंद्र जोगदंड,सतिष शिंदे,नवनाथ तांबडे यांनी केज तहसीलदारांकडे केली आहे.


टिप्पण्या