जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी हिंगोली जिल्हाभरात चोरी छुपे अवैध गुटखा, जुगार, मटका आदि अवैध धंदे जोरात सुरू असून नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्...
जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी हिंगोली
जिल्हाभरात चोरी छुपे अवैध गुटखा, जुगार, मटका आदि अवैध धंदे जोरात सुरू असून नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विषेश पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी परिक्षेत्रातील अवैध बंद करण्याच्या सुचना पोलिस प्रमुखांना दिल्या होत्या मात्र तांबोळी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत परिक्षेत्रातील जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच आहेत.शुक्रवारी मध्यरात्री दबंग आयपिस अधिकारी यतीश देशमुख यांना कळमनुरी शहरात जुगा
र अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली ज्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली यतीश देशमुख यांच्या पथकाने रात्री 1 वाजताच्या सुमारास रेणुकानगर परिसरात झन्नामन्ना जुगारावर कारवाई करून आठ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी 57 हजार 4 मोबाईल,2 मोटारसायकल असा एकून 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आयपिस देशमुख यांच्या कारवाईने अवैध धंदेचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर जिल्हा पोलिस अधिक्षक यांची महत्वाची शाखा म्हणुन ओळखल्या जाणार्या स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती नाही का? असा प्रश्न ही सुजाण नागरिकांमधुन उपस्थित होत आहे. ठाण्यातील बिटजमादाराबरोबर, स्थानिक गुन्हे शाखेचेही प्रतेक ठाण्याच्या हद्दीत बिट जमादार आहेत ते ठाण्याच्या हद्दित फिरत असतात तरीही अवैध धंदे सुरू आहेत या मागे काय गौडबंगाल आहे?अशीही चर्चा रंगली आहे. आता यावर आयजी तांबोळी काय कारवाई करणार याकडे जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS