परभणी/प्रतिनिधी
पाथरी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी वरदान ठरलेल्या पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर्स लक्ष्मीनगर,लिंबा.या खाजगी तत्वावरील शेतकऱ्यांसाठी आधार ठरलेल्या साखर कारखाण्याचा १९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आ.आर.टी.देशमुख यांच्या हस्ते २८ आक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता उसाची मोळी टाकून संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अॅड.रोहित देशमुख यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक,प्रमोटर,अधिकारी कर्मचारी,उसउत्पादक,तोडणी ठेकेदार हे उपस्थित राहणार आहेत.वीस वर्षापुर्वी तालुक्यातील भौगोलीक परिस्थितीचा सारासार विचार करत माजी केंद्रियमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात तालुक्याचे भुमीपुत्र स्व.आशोक सामत यांनी पुढाकार घेऊन गोदावरी काठावर लिंबा येथे केवळ अकरा महीन्यात या साखर कारखान्याची उभारणी करून शेतकरी,कामगार,ऊसतोड मंजूर यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणली आहे.चाचणी हंगामापासुन आजपर्यंत हा कारखाना अखंडपणे सुरु आहे.ऊसाची उपलब्धता अधिक असो की,कमी दरवर्षी गाळप होत आले असल्याने पाथरी तालुक्यासह माजलगाव,सोनपेठ,गंगाखेड,सेलू,मानवत,परभणी ग्रामीण या तालुक्याच्या भागातील ऊस उत्पादकांना हा साखर कारखाना आतापर्यंत उपयोगी पडला आहे.यावर्षी १० ऑक्टोबर रोजी बॉयलर अग्नीप्रदिपन झाल्यानंतर सतत पाऊस पडत असल्याने काही दिवस गाळप हंगामाचा मुहुर्त पुढे सरकला असला तरीही बुधवार २८ ऑक्टेबर रोजी अगदी साधेपणाने कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत सकाळी ११ वाजता या साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी.आ.आर.टी.देशमुख यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन कार्यकारी संचालक अॅड.रोहित देशमुख यांनी केले आहे.
COMMENTS