*बाभळगाव मंडळासह सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करा*

*शिवसेनेच्या वतीने निवेदनातून मागणी* परभणी/प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून पाथरी तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.यामुळे शेत...


*शिवसेनेच्या वतीने निवेदनातून मागणी*


परभणी/प्रतिनिधी


मागील अनेक दिवसांपासून पाथरी तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीकही गेले असून शेतकऱ्यांसमोर अनेक संकटाचा सामना करताना अनंत अडचणीला या सामोरे जावे लागत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी हवालदिल झाला असल्यामुळे आत्महत्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उद्भवण्याची भीती व्यक्त करत.पाथरी तालुक्यातील सर्व मंडळांसह बाभळगाव मंडळ अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने पाथरी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की,शेतकऱ्यांनी यावर्षी दुबार पेरणी तिबार पेरणी करत आपले पिक जोपासून मशागती केल्या मात्र पीक काढणीवेळीच परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अवसानाचा घात केला या सर्व बाबीची गांभीर्याने दखल प्रशासनाने घेणे गरजेचे असतांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांप्रती अविश्वास दाखवत बाभळगाव मंडळ या अतिवृष्टी नोंदीतून वगळले आहे.यामुळे शेतकऱ्यांना मदत करायचे सोडून प्रशासन शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचे दिसून येते.त्यामुळे सदर मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून समावेश करण्याची मागणी करत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे,तालुकाप्रमुख मुंजा कोल्हे,उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड,हरिभाऊ वाकणकर,रामचंद्र आम्ले शाखाप्रमुख माणिक आरबाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel