शेतकऱ्यांच्या विरोधात शासनानी दिलेल्या स्थगीती आदेशाची भाजपाकडून होळी

    धर्माबाद (अहमद लड्डा)  देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी व जनतेच्या हितासाठी अनेक क्रांतीकारक निर्णय घेऊन अंमलबजावणी केल...


 


 


धर्माबाद (अहमद लड्डा)


 देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी व जनतेच्या हितासाठी अनेक क्रांतीकारक निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यामुळे पुन्हा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान जनतेनी मिळून दिला आहे.तसेच शेतकऱ्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य केंद्र सरकारने मिळवून दिले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या अधिकारावर महाराष्ट्र शासन एका आदेशाद्वारे गदा आणण्याचे काम राज्य सरकारने करीत असून मोदी शासनाच्या विरोधात महाराष्ट्र शासन अनेक षडयंत्र रचून जनतेची दिशाभूल करण्याचे कटकारस्थान महाराष्ट्र शासन करीत असल्यामुळे व केंद्र शासनानी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याऐवजी शासन सदरील निर्णयाचा विरोध करीत आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासनाने काढलेल्या एका स्थगती आदेशाची होळी भाजपाच्या वतीने बुधवारी येथील तहसिल कार्यालय व बाजार समितीच्या कार्यालयासमोर करून महाराष्ट्र शासनाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला आहे. 


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य मिळावे, याकरिता नुकतेच तीन ऐतिहासिक कृषी व कामगार कायदे मंजूर केले . मात्र, ज्यांनी आज पर्यंत शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली बेड्या ठोकल्या होत्या तोच काँग्रेस पक्ष व अन्य विरोधी पक्षातर्फे या कायद्याला विरोध करून शेतकर्‍यांची व कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे .महाराष्ट्रात देखील सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्याचाच आधार घेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी बाजार समितीच्या सचिव यांनी समितीच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या शेतमाल खरेदी विक्री व्यवहारावर सेस( मार्केट फीस) आकारण्याचे आदेश दिले आहेत. बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी देखील बाजार समितीच्या आवाराबाहेर होणाऱ्या खरेदीवर सेस वसूल करण्याची घोषणा केली आहे.राज्यातील इतर बाजार समित्यांनी देखील हाच कित्ता गिरविला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण होणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कायदा राज्यात लागू करावा ह्यासाठी भाजपाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा निषेध केला आहे. व स्थगनादेशाची होळी करण्यात आली.


यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार , भाजपाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील बन्नाळीकर, साईनाथ शिरपुरे, नगरसेवक संजय पवार , संजय पाटील शेळगावकर, सुनील पाटील कदम, पिराजी पाटील चव्हाण, अमित मुंदडा,अनुप कासलीवाल, साईनाथ स्वामी ,सज्जन गड्डोड ,ललेश पाटील मंगनाळीकर , कोदळे यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.केंद्र शासनानी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनानी कारावे,यामागणीचे निवेदन तहसिलदार शिंदे यांना देण्यात आले आहे.



COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel