माजलगाव/प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बस्थानाकाच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे लोक आणून टाकतात हीच घाण बघून त्यावर नागरिक लघुशंका करतात म्हणून आज दि.7 ऑक्टोबर रोजी दुपार पासूनच आगर प्रमुख काळम पाटील यांच्या आदेशानुसार माजलगाव आगरचे कर्मचारी यांनी लघुशंका करणाऱ्याच्या गळ्यात हार घालून सत्कार केला आहे.
माजलगाव बस स्थानक परिसरात अनेक महिन्या पासून अनेक ठिकाणी व्यवसाय करणारे लोक कचऱ्याचे ढिगारे टाकतात याचीच दुर्गंधी सर्व परिसरात येत असल्याने नागरिक वैतागले आहेत. सौच्छालया कडे लघुशंका करायला जायचे झाल्यास नाकाला कपडा लावल्या शिवाय पर्याय नाही. आज दुपारी माजलगाव आगारा चे कर्मचारी यांनी आगार व्यस्थापाक काळम पाटील यांच्या आदेशाने वाहतूक निरीक्षक अ.दि.दौंड,वाहतूक नियंत्रक म. पो. गायकवाड, वशिंबे आर. एस. यांनी बस स्थानक परिसरात गाड्या लावल्या आहेत त्यांच्या गाड्याच्या हवा सोडून दिल्या व लघुशंका करणाऱ्याच्या गळ्यात हार घालून त्याचा सत्कार केला.
COMMENTS