केज! प्रतिनिधी
*विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने NEET परिक्षेत अतिशय परिश्रम घेऊण यशस्वी झालेले गुणवंत विद्यार्थी व नुकतेच शासकीय सेवेत रूजू झालेल्या युवकांचा विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी सकाळी 9 वा.विडा येथे करण्यात आले आहे.*
केज तालुक्यातील विडा जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुकताच निकाल जाहीर झालेल्या NEET परिक्षेत परिश्रम घेऊण भरभरून यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व यावर्षी प्रथमच शासकीय सेवेत रूजू झालेल्या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा ट्राॅफी,शाल,श्रीफळ, देऊन अनेक दिग्जांच्या उपस्थित विशेष गुणगौरव करण्यात येणार आहे.तरी सदरील कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याचे आवाहन मीत्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS