माजलगाव/प्रतिनिधी
माजलगाव न प च्या अध्यक्षा सौ. सुमनताई माणिकराव मुंडे यांनी तीन महिन्यांच्या कार्यकाळात काळात विकास कामाला गती दिली आहे यात माजलगाव शहराचा विकास रखडले असताना कमी कालावधी मध्ये विकासाला गती आणली आहे. सौ सुमनताई मुंडे या भारतीय जनता पार्टी च्या तिकीटावर निवडून येऊन गेल्या चार वर्ष उपनगराध्यक्षा तसेच गेल्या तीन महिन्यापासून नगराध्यक्षा आहेत त्यांनी 3 महिन्याच्या कार्यकाळात माजलागाव शहरात विविध विकास कामात गती घेतली आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे च्या निकटवर्तीय आहेत. नगराध्यक्षा चा पदभार घेतल्यापासून माजलगाव न. प. इतिहासा मध्ये पहिल्यांदा दोन ऑनलाईन सर्व साधारण सभा घेतल्या दोन्ही सभेत मिळून विविध विषयाचे 35 ठराव घेऊन खालील विषय मार्गी लावले,वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत 20 कोटी 7 लक्ष रुपये किंमत च्या 111 शहरांतील रस्त्या च्या कामाना शासन ची मान्यता घेऊन लवकरच कामे सुरु होतील शहर स्वच्छता चे 2 कोटी 23 लाख चे टेंडर करून लवकरच कामास सुरवात होईल.
लोकांना शुद्ध पाणी मिळावे एसटी फिल्टर दुरुस्ती आणि लिकेजवार्षिक चे असे अनुक्रमे 35 लक्ष, 50 लक्ष चे काम, घनकचरा व्यवस्थापन चे 2कोटी 75लक्ष चे टेंडर, रस्ता अनुदान चे 70 लक्ष रुपये चे नाली कामचे टेंडर, वार्षिक निविदा 20 लक्ष
असे सर्व मिळून 31कोटी रुपये ची कामे मार्गी लावली आहेत तर पंतप्रधान घरकुल योजने 70 लाभार्थी ला निधी वितरण केले.
रमाई घरकुल योजेने 70 प्रकरणे मान्यतेसाठी शासन दरबारी पाठवले आहेत
COMMENTS