रामदास पाटील माळेगावे गोजेगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
नांदेड येथे पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील लोकांनी आपल्या भागातील गाव तिथे राष्ट्रवादी पक्ष नेण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पक्ष निरीक्षक अविनाश आदिक व रविंद्र तौर यांच्या उपस्थितीत २२ आक्टोबर रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या दरम्यान पक्ष निरीक्षक अविनाश आदिक , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकरणीचे सदस्य रविंद्र तौर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुखेड तालुका अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या उपस्थितीत रामदास पाटील माळेगावे गोजेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करुन राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.
या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे मुखेड तालुका अध्यक्ष शिवाजीराव जाधव, बालाजी पाटील सांगवीकर, कैलास मादसवाड,शेख शादुल होनवडजकर, प्रताप चौधरी, दिनेश पाटील केरूरकर, संभाजी मुकनर, जयभीम सोनकांबळे, विठ्ठल पाटील गोजेगावकर, हणमंतराव पाटील भुरे आदीची उपस्थिती होती.
COMMENTS