....
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड )
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटना ४५११ च्या मुखेड तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण शेषेराव शेळके भासवाडीकर तर उपाध्यक्ष पदी मारोती सटवाजी गदले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी राज्याचे कार्यध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष काझी अल्लाओद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षापासून मुखेड तालुक्याची महाराष्ट्रात राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटना ४५११ ची कार्यकारणी झाली नसल्यामुळे संघटनेचे जिल्हाध्यक्ष काझी अल्लाओदीन यांच्या उपस्थितीत पंचायत समिती मुखेड येथे एका बैठकीचे आयोजन करुण नवीन कार्यकारणीचा प्रस्ताव सादर करीत सर्वानुमते ग्रा.पं.कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण शेळके तर उपाध्यक्षपदी मारोती गदले व सचिव पदी माधव चिकटवाड जाहुरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी किशन चव्हाण मुक्रमाबाद सर्कल प्रमुख,हाणमंत हाके,गोपाळ रेनगुंटवार,गणपत पडलवार,धोंडीबा नागरवाड,या सर्कल प्रमुखांच्या उपस्थिती बरोबर तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.ग्रा.पं.कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण शेळके यांची निवड झाल्या बद्दल दयानंद सोलकंर,गजानन घोनशेट्टे,संतोष हंगरगेकर,नबी शेख,कलीम शेख,रमेश वानकर,संतोष यामावार,गुलाब शेख बामणी,शिवाजी पाटील,माधव आवळे,माधव देवमारे,मारोती बाचेसह आदी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुण पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
COMMENTS