राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )श्रीक्षेत्र माहूरगड येथे संतश्री सामकीमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.28 ऑक्टो.रोजी दु.1 वा.महंत जितेंद्रजी महाराज,योगी श्यामबापु भारती महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
माहूर येथील भाजपाचे युवानेते तथा उद्योजक सुमित राठोड यांनी संतश्री सामकीमातेच्या भव्य मंदिराची निर्मिती केली आहे.या सोहळ्या निमित्त हिंगोली लोकसभेचे खा.हेमंत पाटील,किनवट-माहुर विधानसभेचे आ.भिमराव केराम,भाजपाचे राज्य प्रवक्ता शिरीष बोराळकर,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे,भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पाटील ऊचेकर, तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर,शिवसेना जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे, धरमसिंग राठोड,शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,भाजपा तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव,माजी नगराध्यक्ष समरभाऊ_ञिपाठी, देवकुमार पाटील, जेष्ठ पत्रकार नंदू संतान,वसंत कपाटे,विजय आमले, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे,भाजपा शहराध्यक्ष गोपु महामुने,माहुर न. पं. च्या उपाध्यक्षा अश्विनी आनंद तुपदाळे,स. पो.नि. अण्णासाहेब पवार,कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचेसह विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, अधिकारी,कर्मचारी व असंख्य भाविकांनी उपस्थिती लाऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पौरोहित्य बाळू महाराज समुद्रे व अनुदिप कोरटकर यांनी केले.
COMMENTS