============================
नायगाव प्रतिनिधी.( रामप्रसाद चन्नावार )
.............................................
केंद्र सरकारचे ध्येयधोरण शेतकरी, सुशिक्षित तरुण व महिला साठी अपयशी ठरले असल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे तर तरुणांना नोकरी नसल्याने जोगवा मागण्याची वेळ आली आणि महिला वर्गावर सातत्याने अत्याचार वाढत असून याला जबाबदार केंद्र सरकार असल्याने मा. आ. वसंतराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने नायगावात जोगवा मागण्याचे आंदोलन करण्यात आले.
सत्ताधारी भाजपा सरकारने आपल्या जाहीरनाम्यात हजारो सुशिक्षित तरुणांना नोकरी, संविधानाचे रक्षण, सबका साथ सबका विकास म्हणून सत्ता काबीज केली परंतु तरुणांना नोकरी दिली नाही किंवा विकासाचा ठोस निर्णय घेतले नसल्याने कोणतीही शहर स्मार्ट शहर झाले नाही, शेतीचे कंपनीकरण व कंत्राटीकरण करणारे कायदे केंद्र सरकारने केले असल्याने आमची शेती आमच्या हातून जाणार की काय, याबाबत शेतकऱ्याच्या उरात केंद्रसरकारच्या ध्येय धोरणाविषयी धडकी भरली आहे म्हणून मा. आ. वसंतराव चव्हाण मित्र मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते माणिक पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या नावाने जोगवा द्या मायबाप म्हणून असे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. या जोगवा आंदोलनामध्ये नेतृत्वकार माणिक पाटील चव्हाण, राजेंद्र कांबळे, विठ्ठल बेळगे, सुरज शिंदे, नवनाथ जाधव, श्रीहरी सोमठानकर, जयराज पांढरे, सुनील शेळगावकर, शिवाजी चव्हाण, अभिजीत मंगरुळे, राहुल शेळके, यशवंत मांजरमकर यासह नायगांव युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व मा. आ. वसंतराव चव्हाण मित्र मंडळ उपस्थित होते.
COMMENTS