राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )आज अष्टमी व नवमी एकत्र आल्याने रेणुका गडावर वैदिक मंत्रोच्चारात व षोडशोपचारात सहस्त्र नामावलीने कुंकुम अर्चन करून व पायसाचा नैवेद्य चढवून श्री रेणुका मातेची आरती करण्यात आली. आजच्या विधीचे पौरोहीत्य पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले. अष्टमी व नवमी ह्या दोन्ही माळा एकत्र आल्याने अष्टमी संपताच आज दि.24 ऑक्टो.रोजी सायं.6 वा. मंदिरा समोरील पारंपरिक हवन कुंडात होम हवन विधी संपन्न होणार आहे.
श्री रेणुका मातेचा पूजा विधी पार पडल्या नंतर बोल भवानी की जयच्या जयघोषात वाजत-गाजत परिसर देवता पूजन करण्यात आले.यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव,विनायक फांदाडे,बालाजी जगत,आशीष जोशी,राजे दुर्गादास भोपी,आचार्य चंद्रकांत रिठे, रविंद्र काण्णव,विजय आमले, राजकुमार भोपी,पुजारी सुनील देव,आनंद देव,दिलीपराव पांडे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.
COMMENTS