*
केज प्रतिनिधी.
धनेगावच्या मांजरा धरणावर जलपूजनाचा लोकप्रतिनिधींनी अट्टाहास सुरू केला असून काल बीडच्या पालकमंत्री महोदयांनी आणि आज आमदारांकडुन तुमच्या जलपूजनाचा अट्टाहास केला आहे.परंतु यालाकाही अर्थ नाही.जलपुजनाचे खरे मानकरी लातूरचे पालकमंत्री आहेत.यांना जलपूजन करायचंच असेल तर धरण कार्यालय व धरणाचे अधिकार हे ज्या जिल्यात धरण त्याच जिल्यातील पालकमंत्री/जिल्हाधिकारी यांना अधिकार हस्तातरीत करावे आणि त्या नंतरच जलपूजन करायला यावे.लातुरकरांचा या धरणावर कसल्याही प्रकारचा अधिकार नसतांना राजकारणातुन हे अधिकार लातुरकरांनी स्वत:कडे ठेऊन घतले. बीडच्या लोकप्रतिनीधींनी जलपुजनाचा शो नंतर करावा.आपले धरण आपलेच अधिकार याप्रमाने पुढील काळात अधिकार व कार्यालय बीड जिल्यात हस्तातरीत करून घ्यावेत.असे मत संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष राहुल खोडसे यांनी म्हटले आहे
COMMENTS