नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा आघाडीच्या नांदेड जिल्हा पदाधिकारी यांची २२ऑक्टोबर रोजी गुरुवारी निवड करण्यात आली. यामध्ये नायगांव तालुक्याला झुकता माप देण्यात आले असुन भाजपा महीला आघाडी मोर्चा जिल्ह्या चिटणीसपदी नरसी पंचायत समीतीच्या सदस्या प्रतिभाताई पाटील धानोरकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अनेक हितचिंतकांनी समाधान व्यक्त केले आहे.
खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत भाजपा महीला आघाडीच्या जिल्ह्य चिटणीस म्हणून प्रतिभाताई पाटील धानोरकर यांना या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. पक्षाने वेळोवेळी दिलेली कामे, सूचनांचे पालन करून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रामाणिक कार्य करणार अशी भावना प्रतिभाताई धानोरकर यांनी बोलताना व्यक्त केले. या निवडीबद्दल त्यांनी खा. प्रताप पाटील चिखलीकर जिल्हाध्यक्ष व्यकटराव पाटील गोजेगावकर,आ. राम पाटील रातोळीकर, भाजपा महीला आघाडी मोर्चा च्या अध्यक्षा चिञरेखा पाटील गोरे, श्रावण पाटील भिलवंडे, जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, परमेश्वर गुरूजी धानोरकर, हणमंत पाटील धानोरकर, ओम पाटील धानोरकर, आनंदराव सूर्यवंशी, शिवाजी कोकणे, बालाजी तुपेकर, पञकार गोविंद नरसीकर, कैलास तेलंग, सुभाष पेरकेवार, गंगाधर गंगासागरे, नामदेव वजीरगावे, भगवान पाटील खंडगावकर, शेख जबार करखेलीकर, आदींनी अभिनंदन करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
COMMENTS