नायगांव प्रतिनिधी
महामार्गावर बसविण्यात येणाऱ्या गतिरोधकामुळे भरधाव वाहनामुळे कोणत्याही व्यक्तीला व मुक्या जनावरांना ईजा होऊ नये अथवा वाहनाच्या धडकेने कोणत्याही व्यक्तिला जीव गमावण्याची वेळ येऊ नये या निःस्वार्थी भावनेने नायगावातील मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आणि भाजपचे सक्रीय तसेच बुद्धिजीवी कार्यकर्ते प्रा.डॉ. जीवन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याच्या वतीने इंजि. कसबे साहेब यांना गतिरोधक बसविण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे त्याबद्दल सर्व निवेदनकर्त्याचे अभिनंदन पण गतिरोधक बसवितांना शासकीय नियमाचे पालन न करताच मनमानी पद्धतीने गतिरोधक टाकण्यात आले आहे.एकाच ठिकाणी मोठमोठाले तीन तीन गतिरोधक बसविल्यामुळे सर्वच वाहनधारकांसाठी मोठी अडचण व डोकेदुखी झाली आहे. नरसी ते नांदेड या महामार्गावर कांकाडी, मारताळा, कहाळा, घुंगराळा,देगाव फाटा, नायगांव, खैरगाव व नरसी येथे मोठमोठाले गतिरोधके टाकण्यात आले होते. सध्या नरसी, खैरगाव व नायगाव येथे रस्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे गतिरोधके बुजलेली आहेत. ज्यावेळी गतिरोधके वरील ठिकाणी टाकण्यात आली होती तेव्हा कोणत्याही सरकारी नियमानुसार टाकण्यात आली नव्हती.एकाच ठिकाणी सलग तीन मोठे गतिरोधके टाकण्यात आल्यामुळे मोटारसायकल धारक गतिरोधकांना अडकून पडत होते. कांकांडी येथील गतिरोधकाला अडकल्यामुळे पाठीमागून आलेल्या ट्रकमुळे देगलूर येथील दोन विद्यार्थाना आपले जीव गमवावे लागले, नायगांव येथील यमुनाबाई शाळेच्या मुख्याद्यापिका सौ. फाजगे मॅडम यांना बसमधून प्रवास करतांना काकांडी येथेच बस गतिरोधकावर आदळल्याने मानेचा व पाठीचा कणा मोडल्यामुळे त्यांना अंपगत्व आले, कहाळा खुर्द येथे बसविलेल्या गतिरोधकाजवळ कोणतेच सिग्नल नसल्यामुळे मोठा ट्रक उलटून मोठे नुकसान झाले तर ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली होती. तीन तीन गतिरोधकावरुन मोटारसायकलने महिलांना पाठीमागे बसवून जाताना कमरेचा त्रास होत आहे.हे सर्व उदाहरणे सांगण्याचे कारण म्हणजे गतिरोधके बसवितांना कोणत्याही शासकीय नियमाचे अवलंब केले नाही. एकाच ठिकाणी एकच गतिरोधक नाही तसेच ते वाहनधारक व वाहनाला नुकसान होणार नाही असे नाही.एकही गतिरोधक हापराउंड नसून त्यावर झिब्रा पांढऱ्या पट्टया मारलेल्या नाहीत शिवाय गतिरोधकावर रेडियम नाहीत तसेच समोर गतिरोधक असल्याबाबत अर्ध्या किमी अंतरावर कोणतेच सूचना फलक नाही. त्यामुळे गतिरोधक बसविल्यानंतर कोणत्याही वाहनधारकांना त्रास होणार नाही अशी काळजी घेऊन गतिरोधक टाकण्यात यावे. अन्यथा वाहनधारकाकडून व्यक्तीना वाचविण्यासाठी बसविलेले गतिरोधके वाहनधारकाचे जीवघेणे ठरू नये अशी सर्व वाहनधारकांची मागणी आहे.याशिवाय गतिरोधके खराब झाल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
COMMENTS