राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )अतीदुर्गम व डोंगराळ भागातील रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या माहूर ग्रामीण रूग्णालयात दि.21 ऑक्टो.च्या सायंकाळ पासून भर्ती करण्यात आलेल्या रुग्णांना जेवण देणे बंद असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहे.
आदिवासी बहुल माहूर तालुक्यात जागोजाग प्राथमिक केंद्र व उपकेंद्र कार्यरत असले तरी अनेक कारणाने गोर-गरीब रुग्णांचा ग्रामीण रूग्णालयाकडेच अधिक ओढा असतो.त्या ठिकाणी भर्ती करण्यात आलेल्या रुग्णांना चहा,नाश्ता व जेवण देण्याची जबाबदारी यशोधरा डायट या संस्थेची आहे.परंतु गेल्या 21 ऑक्टो.च्या सायंकाळ पासून ते बंद असल्याने रुग्णांची फार मोठी हेळसांड होत आहे.
दि.21 ऑक्टो.च्या सायंकाळ पासून ग्रामीण रूग्णालयात भर्ती रुग्णांची संख्या 68 एवढी आहे.त्यांना चहा,नाश्ता व जेवण देण्याची जबाबदारी यशोधरा डायट या संस्थेची आहे.अशी माहिती परिचारीका एस.सी.बोथिंगे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
COMMENTS