/////////////////////////
धर्माबाद (अहमद लड्डा) वर्ष २०१२-१३ पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेले कला, क्रीडा व कार्यानुभव विषयाच्यां अंशकालीन निदेशकांची बैठक नांदेड़ जिल्हा परिषदेच्या परिसरात संपन्न झाली. या बैठकीत सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझरसह शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. 22 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. एन.एन. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्रमुख पाहुणे अरविंद तुपकरी सर होते. कार्यक्रमात अरविंद तुपकरी यांच्यासह शौकत अली सर, बंधू कदम यांनी कोर्टाच्या आदेशाबाबत आपले मत मांडले.अरविंद तुपकरी म्हणाले की आता इथे एकत्र मिळून काम करण्याची गरज असून ही न्यायालयाची लढाई संपली असून शासन स्तरावर पाठपुरावा सुरुच राहील. ते पुढे म्हणाले की, कोर्टाची लढाई संपली आहे, परंतु आत्ता सरकारशी लढा आहे. शासन आपली नेमणूक कशी करेल हे आत्ता सांगने चुकीचे ठरेल. नियुक्ती मिळेल, परंतु या नियुक्तीचा विषय कोर्टाने शासनाकडे दिला आहे. म्हणूनच हा विषय सरकारला आठवण करून द्यावा लागेल. या प्रकरणात शासन सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतो. म्हणून सर्वोच्च न्यायालयात क्यावीट दाखल करण्याबाबत ही आम्ही विचाराधीन आहोत. अध्यक्षीय भाषणात एन.एन. वाघमारे म्हणाले की, शाळेवर लवकर नियुक्ति मिळावी ह्यासाठी सर्वांनाच वाटत आहे. पण ही वेळ आता राजकारण करण्याची नाही. सरकार आपल्या स्तरावर सहा महिन्यांत आपली नेमणूक करेल, परंतु त्याआधी आम्हाला नियुक्ती मिळेल काय ?. ह्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. त्यांनी कोर्टाच्या या आदेशाचे स्वागत केले आणि ते म्हणाले की हा निर्णय याचिकाकर्त्या सह कोर्टात न आलेले निदेशकानां पण लागू आहे. त्यामुळे कोणीही नियुक्तीबाबत शंका घेऊ नये. या कार्यक्रमासाठी कपिल वाघमारे, एम.एच. बोंबले, सूर्यवंशी सर, हणमंते सर, लोखंडे सर, लड्डा सर, योगिराज कदम आणि गौतम मिसाळे यांच्यासह अनेक निदेशक यात सहभागी होते. बैठकीत सुरेख असे सूत्र संचालन मोहनराव कावडे महाराज यांनी केले तर शौकत अली सर यांनी आभार मानले. कोरोना संसर्गामुळे ही बैठक कमी अल्पावधीतच पूर्ण करण्यात आली.
COMMENTS