धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना ह्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन एक पासून ते अनलॉक चार पर्यंतही अजूनही शाळा चालू झाल्या नाहीत.त्यामुळे शाळेच्या आवारात मोठे गवत व झाडे झुडपे वाढली असून त्यामुळे भविष्यात अचानक जर शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आतकुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात श्रमदान करण्यात येऊन शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ दारमोड यांच्या नेतृत्वात आकाश सरकलवाड,संतोष बैलकर, निलेश दारमोड, दिनेश मंमोड,गौरव दारमोड, मनोज जाजूलवाड,पवन जगोड,साईनाथ दारमोड,अक्षय पंदीरवाड आणि नरेंद्र दारमोड यांनी श्रमदान करून व तणनाशक फवारणी करून शाळेचे परिसर स्वच्छ केले .एक माजी विद्यार्थी म्हणून हे माझे कर्तव्य असल्याचे मत यावेळेस दिनेश भाऊ दारमोड यांनी व्यक्त केले.
COMMENTS