नायगांव / प्रतिनिधी
नायगांव शहरातील प्रतिष्टीत व्यक्तिमत्व,सेवानिवृत्त शिक्षक पर्यवेक्षक प्रा.पिराजीराव गंगाराम शिरोळे नायगावकर यांचे नांदेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारावर उपचारा दरम्यान वयाच्या ७५ व्या वर्षी गुरुवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे दुःखद निधन झाले आहे.त्यांचे पार्थिवावर गोवर्धन घाट नांदेड येथे स्मशान भूमी येथे दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी,चार मुलं ,नातवंड असा परिवार आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी नायगांव तालुका अध्यक्ष धनराज शिरोळे यांचे ते वडील होतं
प्रतिकूल परिस्थितीत स्वतः शिकून तसेच गरीब मुलांना मोफत शिकवणी देवून हजारो विद्यार्थी घडविणारा हाडाचा शिक्षक व तज्ञ शेतकरी असणारे जनता हायस्कुल नायगांव येथे अध्यापनाचे धडे त्यांनी दिले
कै.शिरोळे सर म्हणजे बहुआयामी,व बहुजनां साठी झटणारे व्यक्तिमत्व ज्ञानदानाच्या सेवे बरोबर समाजिक सेवा व मानवता जपणारा देव माणुस त्यांची ख्याती होती कष्टातून संसार फुलवून शेती निष्ठ शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ख्याती होती.अंत्यत शिस्त प्रिय नायगांव भागातील एक मार्गदर्शक आदर्श शिक्षक नायगावकरांनी गमावला असे सोशल मीडिया तुन सर्वत्र भावना व्यक्त होत आहे.
नांदेड येथे पार पडलेल्या अंत्यसंस्कार समयी: राष्ट्रवादी चे ता अध्यक्ष भास्कर पा.भिलवंडे , शिवसेना नगरसेवक माधव पा.कल्याण,विलास काऊलवार,कृ उ बा स संचालक सतीश लोकमनवार, महेश पतेवार,डॉ.मनोहर रातोळीकर, संजय चव्हाण,साईनाथ हेंडगे, गुलाबराव कदम, सुभाष उप्पे ,बाळासाहेब मुदखेडे, राजेश गाजलवाड,माधव पा.चव्हाण ,
पत्रकार माधव धडेकर ,राजेश बादवाड,केशव पाडागळे,दता नारे,भालेराव सर आदींची उपस्थिती होती.आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२० रोजी गांधी नगर येथे सकाळी ११ वाजाता त्यांच्या अस्थिकलश दर्शन व श्रध्दांजली कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे त्यांचे चिरंजीव भाजपचे मा.नायगांव तालुका अध्यक्ष धनराज शिरोळे यांनी सांगितले.
COMMENTS