धर्माबाद -(अहमद लड्डा)
नायगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध प्रकारच्या कृषी विभागाच्या वतीने असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आधिका-यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे अशी सूचना आमदार राजेश पवार यांनी मतदार संघातील कृषी अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दिली.
शेतकऱ्यांच्या हितर्थ शेती संदर्भातील योजना विहीर पुनर्भरण, शेतकरी गट ,शेतकऱ्यांचे बियाणे संदर्भातील योजना, शेतकरी उत्पादन कंपन्या, फळलागवड, एमआरजीएस अंतर्गत कृषी विभागाच्या योजना व माती परीक्षण यासह विविध प्रकारच्या योजना जनसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पर्यंत पोहोचल्याच पाहिजेत आणि त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिका-यांनी प्रामाणिक पणे कर्तव्य पार पाडावे अशी सूचना आमदार राजेश पवार यांनी दिली.या बैठकीला जिल्हा कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे देगलूर उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के ,धर्माबाद कृषी अधिकारी पवार, उमरी कृषी अधिकारी जाधव ,नायगाव कृषी अधिकारी, धर्माबाद भाजपचे विजय पाटील डांगे आदीजन उपस्थित होते.आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली.
शेतकरी व कृषी विभागाचे अधीकारी ,कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय राहिला पाहिजे व कोणत्या योजना सुरू आहेत,त्याची कितीपत जनजागृती होत व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला की नाही आहे यासंदर्भात वरीष्ठ आधिका-यांनी नेहमी लक्ष घालावे असेही आमदार राजेश पवार यांनी सांगितले.
COMMENTS