*अनंत जाधव/*मस्साजोग*
*केज तालुक्यातील मस्साजोग येथील वयोवृद्ध शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी* हाताच्या बोटाचे ठसे न उमटल्यामुळे कर्जमाफीचा मस्साजोग परिसरातील काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही भारतीय स्टेट बँक शाखा केज या बँकेतून केज तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी पीक कर्ज घेतले होते परंतु महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०१९ च्या कर्जमाफी योजनेच्या यादी मध्ये महादेव शंकर घाटूळ या वयोवृद्ध शेतकऱ्याचे कर्ज माफीच्या यादी मध्ये नाव आले परंतु सदरील शेतकर्यांने शासनाच्या आपले सरकार केंद्रामध्ये वारंवार जाऊन आधार प्रमाणीकरण करत असताना हाताच्या बोटाचे ठसे न उमटल्यामुळे कर्जमाफीचा लाभ सदरील शेतकर्यांला अध्याप पर्यंत मिळालेला नाही तरी कर्ज माफीचा लाभ कधी मिळतो याची वाट शेतकऱ्यांना पहावी लागेल की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे.तरी आधार प्रमाणीकरण करत असताना हाताच्या बोटाचे ठसे उमटत नसणार्या शेतकऱ्यांसाठी दुसरा पर्यायाचा शासन स्तरावर विचार होईल का? नाही याची भिती शेतकऱ्यां मध्ये निर्माण झाली आहे.
COMMENTS