#############
धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद तालुक्यातील बहुचर्चित बाभळी बंधाऱ्याचे 14 दरवाजे गुरुवारी त्रि सदस्यीय समितीच्या देखरेखीखाली बंद करण्यात आले. सकाळपासूनच इथे कडक पोलिस बंदोबस्त होता. वरील प्रक्रिया महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या जल विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. ह्या बंधाऱ्या संदर्भात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यातील पाणी वाद प्रकरणाबद्दल देशभर चर्चा होती. 28 फेब्रुवारी 2013 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी या बंधाऱ्याचे सर्व दरवाजे बंद करण्याची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर 1 जुलै रोजी सर्व दरवाजे पुन्हा उघडले जातात. या प्रक्रियेसाठी नांदेड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता. पी. गव्हाणे, श्री.पडवळ अभियंता, पाटबंधारे उपविभाग उमरी, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.के.मुक्कावार, माजी पोलिस पाटील विठ्ठलराव, बंधारा कृती समितीचे सचिव डॉ.बालाजी कोम्पलवार, सहसचिव जीपी मिसाळे सर व देवराव पाटील मोकले उपस्थित होते. तेलंगणाच्या वतीने श्री रामसागर के अधिक्षक अभियंता डी. सुशील, केंद्रीय जल आयोग हैद्राबाद चे कार्यकारी अभियंता एन. श्रीनिवासराव, श्री राम सागर पोचमपाड चे एस.डी.ओ.चे टी- जगदीश आणि गोदावरी लोवर विभाग हैद्राबाद चे श्री मोहनराव उपस्थित होते. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार कालिदास अंतोजी, बालाजी कुदाळे, अहमद लड्डा आणि हणमंत देसाई उपस्थित होते. येथे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या नेतृत्वात ए.एस आय. नल्लेवाड, गुप्तचर शाखेचे चम्पती कदम, संतोष आनेराय यांच्यासह इतर पोलिस कर्मचार्यांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. हे सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर सध्या 2.45 टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि 331.9. टीएमसी पाणीपातळीवर आहे. आणखी 70 ते 80 टक्के पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.
COMMENTS