* केज प्रतिनिधी. केज तालुक्यातील केवड येथील शेतकरी मिराबाई मधुकर सत्वधर यांनी तीन एकर मधील मळणीसाठी काढून ढिगारा लावून ठेवलेले सोयाबीन म...
*
केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील केवड येथील शेतकरी मिराबाई मधुकर सत्वधर यांनी तीन एकर मधील मळणीसाठी काढून ढिगारा लावून ठेवलेले सोयाबीन मंगळवारी (दि.27) संध्याकाळी 7:30 च्या सुमारास जळून खाक झाले. आग लागलेल्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. सदरील गटातील शेतकऱ्यांची अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरील आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. केज पोलिसात तक्रार दिली आहे
COMMENTS