गल्ली ते दिल्ली हायटेक हॉस्पिटलकडून कोरोना आजारावर लाखोचे बिले वसूल केली जात असताना केवळ 850 रुपयात कोरोना पूर्णपणे बरा करणारा नांदेड शहरातील अष्टपैलू अवलिया : डॉ.प्रमोदअंबाळकर*

        कोरोना सारख्या महामारीच्या पाश्वभूमीवर जागतीक स्तरावर कोरोना ची बाजू अतिशय कलंकीत करण्याचा वाटा हा बहुतांशी मिडियाचा आहे. ह्या कोरोन...


 


      कोरोना सारख्या महामारीच्या पाश्वभूमीवर जागतीक स्तरावर कोरोना ची बाजू अतिशय कलंकीत करण्याचा वाटा हा बहुतांशी मिडियाचा आहे. ह्या कोरोनाने ह्या धावत्या जगाची चाकच बंद पाडली आणि अख्खं जग थांबलं ,निर्मणुष्य झालं .कानं असुन बहिरी ,डोळे असुन आंधळी ,जीभ असुन मुकी झाली आहेत माणसं . माणुस हा माणसापासून व माणुसकी पासून कोसो दूर फेकल्या जातोय .प्रत्येकाला आपापल्या जीवाचं पडलय .मी कसा वाचेल अशी आत्मकेंद्रित भावना प्रत्येक माणसात निर्माण झाली , का कुणी निर्माण केली ?काही कळायला मार्ग नाही. काय होईल? कसं होईल ?कोरोना जाईल का नाही ?जाईल तर कधी जाईल?याचा कुणालाच कशाचा पत्ता नव्हता. प्रत्येक जन हवालदिल झाला होता.


माय- बाप लेकराकडं किंवा लेकरू मायबापाकडं ,बायको नवऱ्याकडे किंवा नवरा-बायको कडे कोणीच कुणाला पाहायला तयार नाही एका झटक्यात माणुसकीचा खून करणारा हा कोरोना त्याच्या अस्तित्वा पेक्षाही भयंकर निर्माण केला तो हा प्रसारमाध्यमांनी .माणसाची पद प्रतिष्ठा, पैसा,मान- मरातब सारं सारं एका क्षणात धुळीला मिळालं होतं. अशा कठीण प्रसंगी माणसाला माणसाची साथ मिळण्याऐवजी माणुसच माणसापासून दूर पळत होता.मी तसा दैव, दुर्दैव माणणारा नाही. पण प्रचलित शब्द म्हणून वापरण्याचा प्रपंच एवढाच हेतू. जाच्या कुणाच्या नशीबी हे कोरोना बाधीताचं जीणं आलं 


त्याचं नशीबच फुटलं असाच प्रघात बणला होता.नव्हे बणवला गेला होता.ह्या महामारीतून कुणी वाचेल का ? हा एक यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. जीवाच्या आकांताने जो तो आपला जीव मुठीत घेऊन सैरभैर झाला होता. तशाही स्थितीत काही वंदनीय अपवाद वगळता भूलोकीचे देव गणले जाणारे डॉक्टर ज्यांनी रूग्णांच्या भरवश्यावर कोट्यवधीचे कर्जे काढून आपले हायटेक हाँस्पीटल्सचे इमले उभे केले होते.त्यातल्याच काहीनी किडनी किंवा शरीरातील इतर महत्त्वाचे अवयव काढणे वा कोरोनाने मृत्यूशी झुंज देणाऱ्या रूग्णांकडून लाखोची फिस उखळणेअसल्या कृष्ण कृत्याने जगासमोर आपल्या भूतलावरील देवत्वाचं रुप उघडं नागडं केलं होतं " ह्या रूपानं मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ही समोर आला होता. " व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात ,खरच हा काळ माणसं ओळखण्याचा खरा काळ होता.पण जे काही वंदनीय डॉक्टर्स, नर्सेस ,पोलिस, पालिका कर्मचारी, आशा वर्कर होते ते मात्र आपल्या कर्तव्यात प्रयत्नाची पराकाष्ठा करत स्वतः चा जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णांची सेवा करत होते. 


      त्या वंदनीय अपवादापैकी एक वंदनीय अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे आमचे मित्र **आ.डॉ.प्रमोद*अंबाळकर**खरंतर ते केवळ माझे एकट्याचेच नव्हे तर संबंध नांदेड शहरासह,शहरानजीकच्या पंचक्रोशीतील गावे, राज्यांतर्गत व राज्याबाहेरील असंख्य रूग्णाचा श्वास म्हणजे 


डॉ.प्रमोद अंबाळकर होते .सरांनी वैद्यकीय क्षेत्रात तर नावलौकीक मिळवलाच होता. पण सोबतच *चंदेरी दुनियेतही एक उत्कृष्ट* *अभिनेता ,एक उत्कृष्ट दिग्दर्शक* म्हणूनही त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता.माझ्या 11 वर्षातील मैत्रीचा अनुभव पहाता .त्यांनी आपल्या कर्तव्यात कधी तडजोड केलेली दिसली नाही. शब्द म्हणजे त्यांच्या साठी प्रमाण होतं.सामाजिक, राजकीय धार्मिक जीवनातही त्यांचं एक अलौकीक स्थान आहे . किती पैसे कमावतो यापेक्षाही किती पेशंटना मी तपासून त्याला व्याधीमूक्त करू शकतो अशाच विधायक गोष्टी कडं त्यांचा कल दिसतो. कधी कधी पेशंटच्या गोंधळामुळे प्रसंगी रागावणे, चिडणे, पेशंटला हाकलून देणे असे प्रकार कित्येकदा घडले तरीपण पेशंटची मानसिकता इतर कुठल्या दवाखान्यात जाण्याची दिसली नाही .तर उलट (म्हाताऱ्या आजींचे दवाखान्यात ऐकलेले प्रत्यक्ष भाव) भांड, बोल, मार ,काही कर बापू सगळं तुझ्याच हातात हाय. तिकडं त्या खाटकायकडं जाऊन हजारो रूपयांचा चुराडा करण्यापेक्षा इथं तीन चारश्यात घोडयासारखं माणूस टणटण होतय . शिव्यानं काय आंगाला भोक पडत्यात काय माय ? नाहीतरी चूक त हया लोकायचीच हाय .पैसे भी कमी लागावं,तपासायला नंबर बी लवकर लागावं .लवकर बरं बी व्हवावं.सगळं कसं मिळल माय.काय तरी सन कराव लागल का न्हाय ?" हे भावोदगार कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत .ही एक प्रतिनिधिक प्रतिक्रिया झाली पण इथं येणाऱ्या प्रत्येक पेशंटची भावना ही अशीच असते.काही नवखेही येतात इथं तपासणीला .इथलं 24×7 तुडूंब गर्दीचं वातावरण पाहुन कुणी कुणी तग धरत नाहीत पण ज्याला कुणाला डॉक्टरच्या औषधोपचाराचा गुण आला की मग मात्र तो इथला पर्मनंट होवुन जातो. मग आपसुकच त्याच्या तोंडी शब्द निघतात ,ती अशी *जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा ।* मंदीरात दर्शनाला बारी लागावी तशी बारी सकाळी 06 ते रात्री 11 वाजेपर्यंत लागते ,कधी कधी तर 12 ही वाजतात पण विशेष म्हणजे दवाखान्याची वेळ सकाळी 09 ते 02, अन् दुपारी 05 ते 08अशी असतांना देखील वेळेआत आलेल्या पेशंटना तपासणीसाठी मग 11वाजो का 12 वाजो तितके पेशंट तपासूनच दवाखाना बंद केला जातो. रात्रीची नोंदणी 08 म्हणजे 08 वाजता बंद होते वेळेनंतर आलेला पेशंट मग तो मित्र असो, नातेवाईक असो ,रेग्युलर पेशंट असो का कुणीहीअसो त्याला मात्र उद्याची वेळ दिली जाते पण त्यावेळी त्या पेशंटला कुठल्याही स्थितीत तपासलं जात नाही.


 एवढं सगळं लिखाण करण्याचा प्रपंच म्हणजे मी गोधने निलेश रा.नांदेड 


(11 वर्षाफपासूनचा संपूर्ण कुटुंब, मित्रमंडळ व नातेवाईकासह पेशंट कम मित्र.) नेहमी सारखा मी सर्दी ,खोकल्याने आजारी पडलो आणि 12 सप्टेंबर सोमवारी उपचार सुरू झाले.औषध घेऊनही बरं नाही म्हणून बुधवारी अतीअंग दुखण्यामुळे परत संध्याकाळी डॉ. कडे गेलो त्यावेळी तात्पुरत्या दोन गोळ्या देवुन सकाळी आपण टायफॉईड ची टेस्ट करू असं ठरलं .त्या दोन गोळ्या मुळे 


तब्बेततीत कमालीचा चांगला फरक जाणवत होता ,जणू मला काही झालच नव्हतं . मी सकाळी शाळेत मराठवाडा मूक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणासाठी देखील जाऊन आलो . आल्यानंतर टायफॉईड ची टेस्ट केली .टेस्ट निगेटिव्ह आली. आता मात्र डॉक्टरनी मला RAT व RTPCR ह्या कोव्हीड -19 च्या टेस्ट करायला


 सांगितल्या. मी NMC च्या नाना नानी पार्क कोव्हीड सेंटरला टेस्ट केली अन रिपोर्ट पाँझिटीव्ह आला . लागलीच मी डॉ. प्रमोद अंबाळकर सरांना फोन केला अन मी *पाँझिटीव्ह* आल्याची कल्पना दिली. ज्यांच्या नावातच प्रमोद अर्थात आनंद आहे तिथे दु:खं किंवा भीती कसली. सरांनी सांगितले की सर अजिबात घाबरू नका आपण करूया तुमच्यावर उपचार , तुम्ही हाँस्पीटलमध्ये या . मी तसा अगोदरच मानसिक द्रष्ट्या फिट होतो वरून सरांच्या आश्वासीत बोलण्याने आनखीन चांगलीच हिम्मत आली अन मी हाँस्पीटलमध्ये आलो .उपचार घेतले आणि सरांचा सल्ला घेऊन घरातील सर्वांचीच कोरोना टेस्ट करण्याचं ठरवलं तसा फोन करून पत्नीला कळवलं की आपणाला तुमच्या सर्वांची कोरोनाची टेस्ट करायला जायचं आहे तयार व्हा. . नंतर मी घरी आलो .मी *पाँझिटिव्ह* आल्याची कल्पना अगोदरच घरी दिली होती.लागलीच सर्वांना गाडीत घेऊन मी परत नाना- नानी पार्कला गेलो .सर्वांची टेस्ट घेतली .सर्वांचाच रिपोर्ट पाँझिटीव्ह आला . पत्नीसह सर्वांकडे पाहिलो कुणाच्याच चेहऱ्यावर भीतीचं सावट काही दिसलं नाही .पत्नी (वनिता),मुलगी(साक्षी), मुलगा(सार्थक) वरून बिनधास्त दिसत असले तरी त्यांच्या मनात काय चाललं होतं काही कळत नव्हतं. चेहऱ्यावरून मात्र ते सर्वजन बिनधास्त असल्याने चे स्पष्ट दिसत होते. ह्या 


रिपोर्टची कल्पना सरांना दिली त्यांना सर्वांना घेऊन हाँस्पीटलमध्ये यायला सरांनी सांगितले .लागलीच तिघांचीही तपासणी करून औषधोपचार दिला. तोपर्यंतच ही बातमी सर्व नातेवाईक व मित्रमंडळात पसरली होती .इतक्यात एका पाँझिटीव्ह अन हाँस्पीटलमध्ये अँडमीट असलेल्या मित्राचा फोन आला. त्याने मला चांगलच घाबरवलं सर कोरोनाला असं इझीगोईंग मध्ये घेऊ नका .अवघड आहे. आतापर्यंत लाख- दिडलाख खर्च झालाय माझा. मी आशा भगवती हाँस्पीटलमध्ये अडमीट आहे .त्यांचं बोलणं मी फारसं मनावर घेतलं नाही. कारण माझा डॉक्टरवरचा व स्वतः वरचा विश्वास गाढ होता . चौघांचे उपचार व डॉक्टरची फिस अवघ्या 1700 रूपयांच्या खर्च्यात आम्ही घरी आलो .स्नान केली  


जेवनानंतर निवांत झोपलो. तदनंतर 5 व्या व 8 व्या दिवशी फेरतपासणीसाठी गेलो .आतापर्यंत चौघांचा एकूण खर्च डॉक्टरची फिस व औषधोपचारासहचा खर्च 3400/रूपये आला . अर्थात तीन वेळेचा प्रती पेशंट *850* इतका माफक खर्च आला होता .पण इतरत्र मात्र ह्या कोरोनामध्ये रोगापेक्षा इलाज भारी झाला होतो.इलाजासाठी लागणारी लाखो रूपये फिस ऐकूनच पेशंट धसकी घेत होता.आपल्या नांदेड सह देशभरात बहुतांश हाँस्पीटलमध्ये लाखभर रूपये डिपाँझिट केल्याशिवाय पेशंटला अँडमीटच केलं जात नव्हतं .कित्येक डॉक्टरांनी तर भीतीपोटी आपली हायटेक हाँस्पीटलं अद्यापही बंदच ठेवली होती.तशाही स्थितीत हा अवलीया मात्र आपला जीव धोक्यात घालून अगदी सर्वसामान्य रूग्णांना कोरोनाच्या औषधोपचाराची सेवा देत होता.


  प्रत्येकाला एका भीतीनं ग्रासलं होतं की आपण ह्या कोरोनातून वाचतोच का नाही ? अशी द्विधा मनस्थिती बनलेल्या व लाखोचा खर्च होणाऱ्या ह्या जीवघेण्या आजारातून दिवसेंदिवस आम्ही ठणठणीत तर झालोच अन तेही केवळ तीन वेळेचा एकून खर्च *प्रती पेशंट 850* रूपये.अशाच प्रकारे *चरक हाँस्पीटल भावसार* *चौक नांदेड*येथे असंख्य गरीब व गरजू रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. डॉक्टर स्यँल्यूट तुमच्या 


हिम्मतीला अन् पेशंटकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहाण्याच्या आपल्या कृतीला व वृत्तीला .पुनश्च एकदा धन्यवाद डॉक्टर तुम्हाला सर्व रूग्णांच्या वतीने *म्हणतात ना ."माणूस शोभून दिसतो मोत्याच्या हाराने नव्हे तर घामाच्या धाराने*" .पण तुमच्या साठी तुमच्या असंख्य रूग्णांचे मनापासून काढलेले भावोदगार 


हेच कोणत्याही हारापेक्षा व पुरस्कारापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. सर अशीच संकटकाळी उपचाराची मायेची पाखर संपूर्ण पेशंटसह 


माझ्यावर व माझ्या संपूर्ण कुटुंबावर राहो ही अपेक्षा .धन्यवाद सर ! 


      


            ♦️ आपला स्नेही ♦️ 


            🙏*निलेश गोधने* 🙏


            ( 8999596033 )    


           (फुलवळकर)रा. नांदेड.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel