263 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 122 बाधितांची भर तर सहा जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 4 :- रविवार 4 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 263 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये स...


नांदेड (जिमाका) दि. 4 :- रविवार 4 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 263 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 122 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 23 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 99 बाधित आले.


 


आजच्या एकुण 874 अहवालापैकी 735 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 16 हजार 321 एवढी झाली असून यातील 12 हजार 808 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 987 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 55 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.


 


या अहवालात एकुण सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गुरुवार 1 ऑक्टोंबर रोजी पंकजनगर नांदेड येथील 82 वर्षाच्या एका महिलेचा, शनिवार 3 ऑक्टोंबर रोजी शामनगर नांदेड येथील 43 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर कंधार तालुक्यातील शिराढोण येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, लेबर कॉलनी नांदेड येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा, हदगाव येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर मुखेड तालुक्यातील वर्ताळा येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 426 झाली आहे.


 


आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 13, बिलोली कोविड केअर सेंटर 3, भोकर कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड केअर सेंटर 2, माहूर कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 8, मुखेड कोविड केअर सेंटर 30, अर्धापूर कोविड केअर सेंटर 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 15, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 129, हिमायतनगर कोविड केअर सेटर 1, खाजगी रुग्णालय 27, कंधार कोविड केअर सेटर 1, किनवट कोविड केअर सेटर 5, लोहा कोविड केअर सेटर 17 असे 263 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.


 


आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 12, किनवट तालुक्यात 1, कंधार 1, धर्माबाद 1, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 3, हदगाव 1, नायगाव 1, हिंगोली 1 असे एकुण 23 बाधित आढळले.


 


तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 57, मुदखेड तालुक्यात 1, हदगाव 3, कंधार 2, नायगाव 4, धर्माबाद 5, उमरी 1, नागपूर 1, नांदेड ग्रामीण 12, हिमायतनगर 1, माहूर 1, लोहा 2, किनवट 3, परभणी 3, हिंगोली 2, जालना 1 असे एकूण 99 बाधित आढळले.


 


जिल्ह्यात 2 हजार 987 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 204, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 833, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 60, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 37, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 15, नायगाव कोविड केअर सेंटर 57, बिलोली कोविड केअर सेंटर 23, मुखेड कोविड केअर सेंटर 66, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 35, लोहा कोविड केअर सेंटर 26, हदगाव कोविड केअर सेंटर 24, भोकर कोविड केअर सेंटर 22, कंधार कोविड केअर सेंटर 23, मुदखेड कोविड केअर सेटर 18, माहूर कोविड केअर सेंटर येथे 18, किनवट कोविड केअर सेंटर येथे 48, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 54, उमरी कोविड केअर सेंटर 40, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात 322 बाधित, बारड कोविड केअर सेंटर 4, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 49, लातूर येथे संदर्भित 2, औरंगाबाद 2, मुंबई 2, आदिलाबाद येथे 2 संदर्भित झाले आहेत.


 



  • जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

  • एकुण घेतलेले स्वॅब- 86 हजार 529,

  • एकुण निगेटिव्ह स्वॅब- 67 हजार 230,

  • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 321,

  • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 12 हजार 808,

  • एकूण मृत्यू संख्या- 426,

  • उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के,

  • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7,

  • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10,

  • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 436,

  • आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 987,

  • आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 55.

  •  


कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel