राम दातीर
माहूर (प्रतिनिधी ) सन्मा. राज साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून माहूर शहरासह तालुक्यातील अनेक युवकांनी दि.4 ऑक्टो.रोजी 1 वा. स्थानिक कपिलेश्वर धर्मशाळेच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र नव निर्माण सेना या पक्षात प्रवेश केला.
मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टेसिंग जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष डॉ. असिफ भाई,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय आराध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अनेक युवकांनी मनसेत प्रवेश घेतला.
यावेळी संदीप पंडित राठोड यांची तालुकाध्यक्ष,सागर काण्णाव यांची उपाध्यक्ष, प्रवीण बापूराव जाधव यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.याचवेळी अक्षय उत्तम परसवाळे यांची शहराध्यक्ष, वैभव जाधव यांची व निशांत पुरी यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. ,मनविसेचे तालुकाध्यक्ष म्हणून सतीश गजानन राऊत,सचिव म्हणून विशाल चव्हाण यांचीही नियुक्ती जिल्हाध्यक्ष रवी भाऊ राठोड यांनी घोषीत केली.या प्रसंगी विजय भाऊ, तालुका उपाध्यक्ष संजय अन्नमवार, मनविसे ता.उपाध्यक्ष निकेत राठोड यांची उपस्थिती होती. सचिन शिंदे,गणेश वर्मा,विनोद मार्गमवार,सचिन मार्गमवार,निरंजन बेहेरे सतीश राऊत,रवी गायकवाड,शुभम तोडसाम,सचिन कांबळे,वैभव कांबळे,श्रीरंग शिंदे,आदर्श बेहेरे,संदीप बर्डे,गणेश गायकवाड,अक्षय कांबळे,आकाश कुमरे आदींनी पक्ष प्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राम दातीर यांनी केले.
COMMENTS