. उमरी प्रतिनिधी उमरी:- दि.29 ऑक्टोबर पोलिस ठाणे उमरी येथे पोलिस नायक या पदावर कार्यरत असलेले गोळेगाव बिटचे बिट जमादार तालुक्यातील जनतेची ...
.
उमरी प्रतिनिधी
उमरी:- दि.29 ऑक्टोबर पोलिस ठाणे उमरी येथे पोलिस नायक या पदावर कार्यरत असलेले गोळेगाव बिटचे बिट जमादार तालुक्यातील जनतेची एक निष्ठ सेवा देणारे अभ्यासु व्यक्तीमत्व सुधाकर मुंजाजीराव पाटील वय ५२ वर्षे पोलिस नाईक बक्कल नंबर. २४५२ नेमणूक पोलिस ठाणे उमरी. रा लेबर कॉलनी नांदेड .यांना आज रोजी पहाटे ०३.०० वाजता छातीत दुखू लागल्याने फिनिक्स हॉस्पिटल गोकुळ नगर शिवाजी नगर नांदेड येथे अॅडमिट केले असता पहाटे ०५.०० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचे मुळ गाव वानेगाव असुन त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले, असुन इश्वर त्याचे आत्म्यास शांती देवो. तालुक्यातील व गोळेगाव परीसरातील जनतेतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS