माजलगाव/प्रतिनिधी
येथील म. शि प्र. मंडळाच्या सुंदरराव सोळंके महाविद्यालयात कोविड19 च्या नियमांचे पालन करत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ व्ही पी पवार होते.प्रारंभी शिक्षक दिनानिमित्त डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार म्हणाले की शिक्षण क्षेत्रात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. मानवी विकासाचा पाया शिक्षण असून शिक्षणच परिवर्तन घडवत असते यामध्ये शिक्षकाची भूमिका अनन्यसाधारण आहे.विदयार्थ्यांमध्ये प्रेरणा शिक्षकच निर्माण करतात. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. के. बी गंगने, उपप्राचार्य प्रकाश गवते, प्रा सुदर्शन स्वामी, प्रा संजय बागुल, सौ अरुणा स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा गणेश मोकसरे यांनी केले तर आभार प्रा डॉ एम ए कव्हळे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य पवनकुमार शिंदे,पर्यवेक्षक प्रा गणेश सोळंके,डॉ महेंद्र वानखडे,डॉ काकासाहेब नळे, प्रबंधक प्रशांत चव्हाण, अजित हजारे यांची उपस्थिती होती
COMMENTS