माजलगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील तालखेड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक, बीड च्या मॅनेजरने चक्क शेतकर्यांना शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी सदरील शेतकरी हनुमान शिंदे यांच्या तक्रारीवरून माजलगाव ग्रामीण पोलीसात मॅनेजर प्रमोद हात्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुकयातील तालखेड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत खेर्डा येथील शेतकरी हनुमान बाबासाहेब शिंदे हे पी.एम.किसान योजनेअंतर्गत अनुदान उचलण्यासाठी शुक्रवार दि.4 रोजी गेले होते. यावेळी बॅकेत कॅशियर ला कॅश कसे काय आली नाही, असे विचारले असता. मॅनेजर प्रमोद हात्ते यानी शेतकरी शिंदे यांना तु कोन विचारनार असे म्हणून शिवीगाळ करत धमक्या दिल्या.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात शेतकरी हनुमान शिंदे यांच्या फिर्यादीवरून मॅनेजर प्रमोद हात्ते यांच्या विरूध्द शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक राजेंद्र ससाणे हे करत आहेत.
---------------------------
मुजोर मॅनेजर हात्ते यांना निलंबीत करा - भाई गोले पाटील
तालखेड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे मॅनेजर हे शेतकर्यांची वेळावेळी अडवणूक करतात. ऐवढेच नव्हे तर शेतकर्यांची असभ्य वर्तन करत शिवीगाळ करून अपमानास्पद वागुणक देतात. अशा मुजोर मॅनेजर प्रमोद हात्ते याना तात्काळ निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवारी शेतकरी कामगार पक्षाचे भाई अॅड.नारायण गोले पाटील यांनी केली आहे.
COMMENTS