*नायगाव विधानसभेचे आमदार म्हणजे जनसामान्य साठी एक साक्षात्कारच*- विजय पाटील डांगे

  धर्माबाद (अहमद लड्डा) नायगाव विधानसभेमध्ये प्रमुख्याने तीन तालुक्याचा समावेश आहे, यामध्ये धर्माबाद उमरी आणि नायगाव तसेच क्षेत्रफळाने ही जि...


 


धर्माबाद (अहमद लड्डा) नायगाव विधानसभेमध्ये प्रमुख्याने तीन तालुक्याचा समावेश आहे, यामध्ये धर्माबाद उमरी आणि नायगाव तसेच क्षेत्रफळाने ही जिल्ह्यातील इतर विधानसभे पेक्षा बऱ्यापैकी मोठे असलेली विधानसभा, याची लोकसंख्या 2 लाख 90 हजारापेक्षा अधीक व दोन लाख 35 हजाराच्या वरचे मतदान असलेल्या विधानसभेचे, *यशस्वी नेतृत्व सध्या आमदार राजेश पवार साहेब* यांच्याकडे आहे.


विधानसभा 2014 च्या माध्यमातून पवार साहेब हे नायगाव विधानसभेच्या तिन्ही तालुक्यातील जनसामान्यांच्या हितार्थ उडी घेतली, परंतु त्यांना थोडक्यांत अपयश आले, मात्र साहेब ह्या अपयशाने हातास झाले नाहीत,परंतु त्यांना 2014च्या विधानसभेत आमदार म्हणून, पाहू इच्छिणाऱ्या जनसामान्य मतदार मात्र हाताच्या भावनेत भारावून गेले होते.


त्याचे कारण असे होते की, नायगाव मतदार संघाला कोणीतरी वाली हवा होता. कारण 2009 पासून स्वतंत्र झालेली नायगाव विधानसभा मात्र हुकुमशाहीच्या अंधारी पिंजऱ्यात पार अडकून पडली होती..


2014 ते 2019 चा कार्यकाळ हा 2009 ते 2014 सारखाच विकास हिन गेला. आमदार काय असतो, त्याचे अधिकार काय असतात, हे मात्र जनसामान्यांना कधीच माहीतच झाले नाही,


 कारण हा काळ जनसामान्याचा नव्हताच हा काळ फक्त चेले-चपाटे, चमच्यांच्या होता...


परंतु *राजेश पवार साहेब व पुनम ताई पवार* हे मात्र निवडणूक पराभवाच्या नंतरही, विधानसभेची अशी परिस्थिती पाहून, कुठलेच शासकीय किंवा लोकनियुक्त पद नसतानादेखील,फक्त जनहितार्थ गोरगरिबांच्या कल्याणासाठी, कार्याची कंबर कसत पायाची भिंगरी करत, पवार दाम्पत्य मात्र आपली कसलीच पर्वा न करता,अब्जो-करडो रुपयांची संपत्ती असतानासुद्धा, पवार साहेब हे जन संपत्ती हीच माझी खरी संपत्ती मानत, सर्व विधानसभा पिंजून काढण्यास सुरुवात केली. ज्या गावात पाणी नाही त्या गावात स्वखर्चाने टॅंकर लावत बऱ्याच गावची तहान भागवली, गरिबांसाठी बराच उपचाराचे फिरते हॉस्पिटल ची संकल्पना प्रत्यक्षरित्या अमलात आणली, निराधारांचे कामे असतील किंवा विधानसभेतील भूसंपादनातील शेतकऱ्यांचा करोडोंचा मावेजा मिळून देण्यात संदर्भातला विषय असेल,


 सामाजिक कार्यात कोणतीही जात,धर्म उच्च-नीच न पाहता,मी आपल्यातलाच एक माणूस असल्याची जाणीव लोकांच्या हृदयात करून दिली. खेडो-पाडी तांड्या वस्त्यांवर रात्री बेरात्री स्वतः जाऊन लोकांच्या समस्येचे निराकरण करू लागले, फडवणीस सरकार कडून करोडोंचा निधी आणत शेकडो गावांच्या विकासाला निस्वार्थ हातभार लावला.


विधानसभेतील तिन्ही तालुक्यातील गोरगरीब जनता पावसाळ्यात भिजू नये. म्हणून प्रत्येक दारोदारी लाखोंच्या संख्येने छत्रीचे वाटप करत, रस्त्यावरील छोटे-मोठे व्यापारी यांना सुद्धा मोठ्याछत्रीचे वाटप करत, जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात वेगळाच विक्रम नोंदवला.


हे सर्व काम करत असताना मात्र, तत्कालीन आमदार पेक्षाही राजेश पवार साहेब हे मात्र जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत झाले. हा सर्व प्रकार तत्कालीन चमच्यांना हजम होत नव्हता, आत्ता ही होत नाही. व ते पवार साहेब यांना बदनामी करण्याचा षड्यंत्राचा डाव तेव्हापासून ते आतापर्यंत सुरूच ठेवला आहे..


परंतु याने पवार साहेब कधीच खचले नाहीत.


जनसामान्यांच्या व पवार साहेबांनी केलेल्या कार्याच्या जोरावर, 2019 च्या विधानसभेत राजेश जी पवार साहेब हे आमदार होत, विधानसभेच्या इतिहासातील सर्वाधिक मताने निवडून येत, एक वेगळाच इतिहास रचला.


पवार साहेब आमदार झाल्यानंतर लगेच, विधानसभेतील अधिवेशनामध्ये नायगाव विधानसभेतील भ्रष्टाचाराचा व अवैध धंद्या चा पाढा वाचत *हे माझ्या मतदारसंघात चालणार नाहीच ब्रिद घोषणा केली..*


हे सर्व भ्रष्ट व अवैध काम करणारे एकत्र येत, काही प्रशासकीय लोकांना हाताशी धरत, आमदार राजेश पवार साहेबांना षडयंत्रात्त अडकविण्याचा अतोनात प्रयत्न केला, व ते त्यात निष्फळ ठरले, व त्याचाच एक भाग म्हणून, काल परवाच्या व्हाट्सअप वर फिरत असलेल्या ऑडिओ, एका समूहाने निव्वळ आमदारांना बदनामी हेतुपूर्वक कॉल करण्याआधी पासून रेकॉर्डिंग करत व्हायरल केला,


परंतु नायगाव विधानसभेतील *जनता सब जानती है!!!* 


    चा हेतूने असून लोक आमदारांच्या समर्थनात लाखोंच्या संख्येने उभे राहिलेत.


आणि आमदारांना धीर देतात की *साहेब चिंता नसावी!!* लाखो जण सामान्य जनता आपल्या पाठीशी उभी आहे..


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel