माकप प्रणित किसान सभेचे तालखेड फाटा येथे दुधाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

  रोडवर दगडाला दुधाचा अभिषेक घालत सरकारचा केला तीव्र निषेध !   तालखेड / माजलगाव (ता.१) : अखिल भारतीय किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष स...


 


रोडवर दगडाला दुधाचा अभिषेक घालत सरकारचा केला तीव्र निषेध !


 


तालखेड / माजलगाव (ता.१) : अखिल भारतीय किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन तीव्र करण्याची हाक किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले.


 


दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. 


 


लॉकडाऊनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दुधाला ३० ते ३५ रुपये दर मिळत होता. मात्र लॉकडाऊनमुळे दूध मागणी घटल्याने दुधाचे भाव १७ रुपयांपर्यंत खाली कोसळले. शेतकऱ्यांना अशा संकटात मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने प्रति दिन १० लाख लिटर दुध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना या योजनेद्वारे किमान २५ रुपये दराची हमी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ही योजना केवळ सहकारी दूध संघांनाच लागू करण्यात आली. राज्यातील ७६ टक्के दूध संकलित करणाऱ्या खाजगी दूध कंपन्यांना यातून वगळण्यात आले. परिणामी सरकार प्रतिदिन १० लाख लिटर दूध खरेदी करू शकले नाही. शेतकऱ्यांना यामुळे पुरेसा दिलासा मिळाला नाही. योजना सुरू असतानाही दुधाचे खरेदी दर यामुळे १७ रुपयांपर्यंत खाली आले. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर आता दूध विकत घेण्याऐवजी किंवा कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी सरळ शेतकऱ्यांना मदत करावी, प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे ही मागणी किसान सभा व संघर्ष समितीने केली आहे.


 


अखिल भारतीय किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तालखेड फाटा येथे करण्यात आलेल्या आंदोलनात माकपचे तालुका सचिव व किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष कॉ. मुसद्दीक बाबा सर, माकपचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ.ऍड. सय्यद याकूब, किसान सभेचे नेते व तालखेडचे उपसरपंच कॉ. विनायक चव्हाण, माकपचे तालखेड शाखा सचिव कॉ.आबा राठोड, रोहिदास जाधव, विजय राठोड, भीमराव जाधव, जगन्नाथ चव्हाण, संतोष जाधव, शिवाजी जाधव, बबन चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, रवी राठोड, किरण राठोड आदी उपस्थित होते.


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel