भारतीय जनता पक्षाच्या वतीने झिरो फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

 पूर्णा (संतोष पुरी )पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथेआज शनिवारी १ऑगस्ट रोजी झिरो फाटा येथे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दुध दरवाढी संदर्भात दुध एल्गार आंदोलन करण्यात आले. 


           शेतकरी व दुध उत्पादकांच्या हितासाठी राज्य सरकारच्या विरोधात खालील मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले या वेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 


 *१) दुधाला ३० रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे.*


*२)दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर १० रुपये अनुदान जमा झालेच पाहिजे.*


*३)अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला ५० रुपये अनुदान मिळाले पाहिजे.*


या मागण्यांसाठी *भारतीय जनता पार्टी पुर्णा तालुक्याच्या वतीने दूध दरवाढ आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत (बाळासाहेब कदम), बालाजी देसाई,अनंतराव पारवे (तालुका अध्यक्ष),रासपाचे गणेश कदम,प्रशांत कापसे (शहर अध्यक्ष), लिंबाजी भोसले,आनंद बनसोडे, बालाजी खैरे,विश्वनाथ सोळंके,विजय कराड,भारत एकलारे,विश्वनाथ होळकर,ईत्यादी सह दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते



टिप्पण्या