माजलगाव मध्ये भाजपाचे महाएल्गार आंदोलन शासनाने शेतकऱ्यांच्या दूधाला भाव वाढवून द्यावा - रमेश आडसकर

 



माजलगाव | प्रतिनिधी


संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने दूध दरवाढ करावी तसेच प्रति लिटर अनुदान द्यावे या मागणीसाठी माजलगाव येथे शनिवारी दि. १ ऑगस्ट रोजी भाजपाकडून रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध केला.


 


शेती पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहेत. परंतु त्यास बाटली बंद पाणी पेक्षा ही दर कमी असल्याने त्यातही नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या दूधाला भाव वाढवून देण्यात यावा, प्रति लिटर अनुदान देण्यात यावा या मागणीसाठी माजलगाव येथे भाजपाकडून शहरातून जाणाऱ्या कल्याण-विशाखा पट्टणम राष्ट्रीय महामार्गावर सिंदफणा पुलावर रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते रमेश आडसकर यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका करत संकटात सापडलेल्या जगाच्या पोशिंद्याला आधार देण्यासाठी शासनाने दूधाचे दर वाढविण्यात यावे, तर प्रति लिटर अनुदान द्यावे अशी मागणी केली. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण राऊत, ज्ञानेश्वर मेडंके, माजी नगरअध्यक्ष डॉ. अशोकराव तिडके ,बबन सोळंके, हनुमान कदम, शहराध्यक्ष ॲड. सुरेश दळवे ,प्रशांत पाटील ,नगरसेवक दिपक मेडंके, ईश्वर होके,विनायक रत्नपारखी ईश्वर खुर्पे ,सरपंच आण्णासाहेब काळे, उद्धवराव ताकट ,जयराम गायकवाड ,प्रदिप देशमुख कल्याण शेप ,जयपाल भिसे ,सुशांत जाधवर ,उत्तम डांगे, आरपीआयचे संदिप साळवे, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष उत्तम पवार, मनोज फरके ,विजय रांजवण,शहेबाज शेख ,बाळासाहेब धपाटे शुभम भुरकवडे ,अंनत जगताप ,अंनत यादव,बाळासाहेब क्षीरसागर,संतोष जाधव,अनिल धुमाळ सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या