धर्माबाद दि.8 -(अहमद लड्डा) तालुक्यातील नामांकित व सदैव अग्रेसर सामाजिक संस्था जनसेवा प्रतिष्ठाण तर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात पार...
धर्माबाद दि.8 -(अहमद लड्डा) तालुक्यातील नामांकित व सदैव अग्रेसर सामाजिक संस्था जनसेवा प्रतिष्ठाण तर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणारा तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 2020 यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे रद्द केला असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा जनसेवा प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांनी दिली आहे. हा कार्यक्रम रद्द करुन यंदा कोविड काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार,नगरपालिका कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून यथोचित सन्मान केला जाईल असे आयोजन केले आहे. यासाठी तालुकाध्यक्ष सचिन वानखेडे, तालुका सचिव धनंजय बोधनकर सह सर्व पदाधिकारी तयारी करत आहेत.
COMMENTS