**
धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोनाच्या या बीमरीमुळे महाराष्ट्रासह देशात तीन ते चार महिन्या पासून सतत लॉकडाऊन पडत असल्या कारणाने शेतकरी,शेतमजूर, गोरगरीबाचे हाल होत आहेत तरी ही काम शोधल्यावर सुध्दा नागरिकांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे पोटभर अन्न मिळणे अवघड झाले आहे तरी याकाळात भरमसाठ विद्युत बिल आल्याने नागरिकाचे डोके चक्रावत आहे.काही नागरिक लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन बिल भरलेले असतानासुद्धा जास्तीचे बिल आलेले पाहून विद्युत ग्रहक परेशान आहेत. विद्युत कार्यालयात लाईट बिलच्या संदर्भात विचारणा केली असता लाईनमन आपापल्या गुंगीत असतात व उडवाउडवीचे भाषा बोलतात कोणाच्या जागेवर कोन काम करते हेच कळेनासे झाले याकडे वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे व जास्तीचे बिल आलेले कमी करून मिळावे अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. याकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष देऊन शेतकरी,शेतमजूर,
गोरगरीब,मजूर यांचे बिल माफ करावे अशी मागणी होत आहे.
COMMENTS