सलगरा खुर्द येथील मागासवर्गीय व्यक्तीच्या नावे असलेल्या गायरान जमिनीवर गावातील  गावगुंडाकडून अतिक्रमण....

  जबरीने अतिक्रमण करणाऱ्या गावातील  जातीयवादी गावगुंडावर तात्काळ कार्यवाही करा या मागणीसाठी तहसीलदार यांना दिले निवेदन.... -----------------...


 


जबरीने अतिक्रमण करणाऱ्या गावातील 


जातीयवादी गावगुंडावर तात्काळ कार्यवाही करा


या मागणीसाठी तहसीलदार यांना दिले निवेदन....


--------------------------


 


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


मुखेड तालुक्यातील सलगरा खुर्द येथील देवबा नागोराव सोनकांबळे यांच्या नावे सलगरा खुर्द


हद्दीतील गट क्र.२७ मधील क्षेत्र १ हेक्टर व अनुसयाबाई नागोराव सोनकांबळे यांच्या नावे गट क्र.२७ मध्येच एक हेक्टर एवढी जमीन असताना


सदरील ही गायरान जमीन १९९२ मध्ये फेर झालेली असून या जमिनीवर गावातील


जातीयवादी मोहन धोंडीबा कानगुले, व नागोराव धोंडीबा कानगुले (नांदेड पोलीस) या जातीयवादी


प्रवृत्तीच्या दोन व्यक्तींकडून देवबा नागोराव सोनकांबळे यांच्या नावे ७/१२ असलेल्या जमिनीवर जबरीने अतिक्रमण करीत जातीवाचक


शिवीगाळ करीत महारग्या,धेडग्या, अशा अर्वाच भाषा वापरून मी पोलीस कर्मचारी आहे , तुला काय करायचं ते कर, तू कुठेही गेलास तर माझ काहीही वाकड होणार नाही असे मी शेतातील दगडे गोळा करीत असताना धोंडीबा कानगुलेच्या


समुहातील २०-२५ लोकांनी दि.२ ऑगस्ट रोजी


माझ्या शेतावर काट्या घेवून येवून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याने मी व माझे कुटुंबीय भयभीत झाल्याने दि.३ ऑगस्ट रोजी 


मुखेड तहसीलचे तहसिलदार काशिनाथ पाटील यांना निवेदन दिले असल्याचे तक्रारदार देवबा सोनकांबळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन देतेवेळी तक्रारदार देवबा नागोराव सोनकांबळे,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, डॉ.राहुल कांबळे, संदीप कांबळे 


बावलगावकर, रामा गोणारे, शिवाजी सोनकांबळे, अंतेश्र्वर दुधकावडे, रमेश घायाळे,चंद्रकांत घायाळे


विश्वनाथ देशमुख सह पत्रकार भारत सोनकांबळे सह गावातील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सोनकांबळे, गुंडेराव पवार (ग्रा.पं. सदस्य) इत्यादींची उपस्थिती होती.


या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन मला व माझ्या कुटुंबाला गावातील मोहन धोंडीबा कानगुले, व नागोराव धोंडीबा कानगुले (नांदेड पोलीस) या जातीयवादी प्रवृत्तीच्या दोन व्यक्तींकडून जीवितास धोका असल्याचे दैनिक आजचा लोकप्रश्न मुखेड तालुका प्रतिनिधी भारत सोनकांबळे यांच्याशी बोलताना सांगितले.


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel