धर्माबाद-(अहमद लड्डा)
धर्माबाद तालुक्यात मुबलक प्रमाणात युरिया खतांचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला असून तालुक्यात युरिया ची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही नांदेड जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उपाध्यक्ष सौ. पदमाताई सतपलवार यांनी दिली आहे
तालुक्यातील युरिया खता संदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी श्री नादरे व जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे दोन दिवसांत हा खत बाजारात उपलब्ध होणार आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी काळजी करू नये तसेच बाजारात कोणत्याही व्यापा-याकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने विक्री करण्याचा प्रकार घडल्यास थेट जिल्हा प्रशासनाकडून गंभीर कार्यवाही करण्यात येईल असेही त्या म्हणाले.
तालुक्यातील युरिया खतांचा तुटवडा निर्मान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आकाश रेडी यांच्याकडे याबाबत माहिती दिली तद्नंतर त्यांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे याबाबत माहिती घेऊन तात्काळ युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
COMMENTS