डॉ .अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असणाऱ्या समाजनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करणार--दत्ता कांबळे


 


 साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वडार समाजमंदिर येथे वृक्षरोपण


 


माजलगाव/भास्कर गिरी


       साहित्यरत्न लोकशाहीर डॉ .अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील इंदिरानगर येथील वडार समाजमंदिर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ .अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वृक्षारोपण करून एक नवा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे .


यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती कोविड १९ च्या प्रादुर्भाव व जिल्हाप्रशासनाची आचारसंहिताचे पालन करून छोट्या खाणी वेगवेगळे उपक्रम घेऊन राज्यभरात साजरी केली जात असून ,शहरातील इंदिरानगर परिसरात वडार समाजमंदिर येथे कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाच्या वतीने वृक्षारोपण करून साहित्यरत्न डॉ .अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले , यावेळी डॉ .अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असा समाजनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असून अण्णाभाऊच्या साहित्यातील उपेक्षित व वंचित समाजातील घटकाला शैक्षणिक व सामाजिक द्रुष्टीने सक्षम करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी यावेळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे .यावेळी अतुल साळवे , अंशीराम कांबळे , संकेत कासार , सुनिल मासूकळर , रुद्राक्ष कूरे, श्री जाधव , गणेश जाधव सह शारीरिक अंतर ठेऊन समाजबांधव व कार्यकर्ते उपस्तीत होते.


टिप्पण्या