कारेगाव फाटा भारतीय जनता पार्टी च्या वतीने राज्यव्यापी महाएल्गार व रास्ता रोको आंदोलन   


 


धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे भाजपाच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आले व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या "गाईच्या दुधाला सरसगट दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान द्यावे व दूध पावडर ( भुक्टीला) निर्यातीला प्रति किलो पन्नास रुपये एवढा अनुदान देन्यात यावे तसेच दूध खरेदीचा दर प्रति लिटर तीस रुपये प्रमाणे करन्यात यावे या तीन प्रमुख विषयासाठी भाजपा तर्फे आमदार राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सौ पूनमताई पवार च्या मार्गदर्शनात व धर्माबाद भाजपा चे माजी तालुका प्रमुख विजय पाटील डांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तहसीलदार च्या नावे निवेदन देण्यात आले. सामाजिक आंतर व कोरोना चे निकष पालन करून प्रशासनाकडे निवेदन दिले. धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे आमदार राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सौ पूनम ताई यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी भाजपा तालुका अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले व राज्य सरकार च्या विरुद्ध घोषणा ही देण्यात आले, ह्यावेळी बाजार समिती संचालक रमेश गौड, अशोक पाटील वडजे, पत्रकार गाडीवान , सतीश मोटकूल, शिवदास कदम , सज्जन गद्दोड, गंगाधर गौड, पांडूरंग पाटील जगदंबे आणि दत्ताहरी पाटील सहित हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या