======================
*अन्यथा संबंधित बँकांना टाळे ठोकण्याचा इशारा*
======================
केज:-
याविषयी सविस्तर वृत्त असे कि बीड जिल्ह्यामध्ये पिक कर्जा संदर्भात आवश्यक कागदपत्राच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक आर्थिक पिळवणूक केली जात आहे बँकांनी सहजा सहजी शेतकऱ्यांना मदत व्हावी व चालु असलेल्या कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्याची होणारी अडवणूक थांबावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजल्या पासून 4 वाजेपर्यंत एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून मुजोर बँकांचा निषेध केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून केज तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन तहसील समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
यामध्ये प्रमुख मागण्या, १)शेतकऱ्यांना कुठली ही अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज वाटप करावे. २)मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊनही कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देऊन दुसरे कर्ज वाटप करावे,
३)बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज तात्काळ विना अट वाटप सुरू करावे.
४)दुबार पेरणीची वेळ आलेल्या व फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बि- बीयाणे कंपनीकडून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी भरपाई देण्यात यावी. ५)वयोवृद्ध शेतकऱ्यांना देखील पीक कर्ज वाटप करावे.कुटुंबातील एकत्र क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्ज बँकांनी द्यावे ,६)वीज वितरण कंपनीने लॉकडाउन काळातील चार महिन्याचे वीज बिल माफ करून वाढीव वीज बिल दुरुस्त करून द्यावेत,७) केज तहसील मधील नायब तहसीलदार सह अनेक वर्ष काम करणार्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात.अशाप्रकारच्या विविध मागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालया समोर एकदिवसीय आन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे, तरी यावर शेतकऱ्याची बँके कडून होणारी अडवणूक नाही थांबली तर संबंधित बँकांना टाळे ( कुलुप ) ठोकण्यात येईल व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची शासन प्रशासनाने नोंद घ्यावी असा खणखणीत ईशारा भाई अशोक रोडे, मंगेश देशमुख, बाबाराजे गायकवाड, विशाल मुळे, जी. देशमुख,राज तपसे व इतर यांच्याकडून देण्यात आला आहे.
COMMENTS