माजलगाव/भास्कर गिरी
तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी माजलगाव शहरात व इतर ग्रामीण भागात आनेक गावात अन्नत्याग आंदोलन अॅड. भाई नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मागण्या साठी सातत्याने आंदोलने करणाऱ्या शेकापच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करा, राष्ट्रीयकृत बँकांनी तात्काळ व सरसकट कर्ज वाटप करावे, एसबीआय, एसबीएच, या बँकांनी आठ दिवसात पूर्ण कर्ज वाटप करावे, बीड जिल्ह्यातील शेत रस्त्यांचे मजबुतीकरण तात्काळ करावे, बोगस बियाण्यांच्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 50000 रुपये भरपाई द्यावी, वयोवृद्ध व अज्ञान शेतकऱ्यांना ही कर्ज देताना कसलीही अडचण आणू नये, तसेच गंगामसला डीसीसी बँकेतील कामचुकार कर्मचार्यांवर कारवाई करावी या व इतर मागण्यांसाठी तालुक्यातील सादोळा, छोटीवाडी, खेर्डा, खरात आडगाव, छत्र बोरगाव इत्यादी ठिकाणी तसेच माजलगाव शहर येथे शेकापच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सादोळा येथे शेताच्या बांधावर बसून शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले तर काही गावात मंदिरासमोर तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसून शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.
या आंदोलनात भाई अॅड. नारायण गोले पाटील, आशोक सोळंके,रणजित जाधव,विक्रम सोळंके,लखन सोळंके,बालासाहेब शिंदे यांच्यासह सह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
सादोळा येथे बांधावर अन्नत्याग
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथेशेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शिवार सादोळा गट नंबर 405 चे शेतकरी बालासाहेब शिंदे यांचे बांधावर अन्नत्याग आंदोलन करून सरसकट पिक कर्ज माफ करावे कर्ज वाटप करावे आदी मागण्यांच्या घोषणा देत शासनाचा निषेध केला.
छोटी वाडी मारुतीच्या पारावर अन्नत्याग.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गंगामसला येथील काम चुकार कर्मचार्यांना तत्काळ निलंबित करा, पीक कर्ज वाटप करा, सरसकट कर्जमाफी करा, बोगस बियाणांच्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. आदी मागण्यांच्या घोषणा देत छोटी वाडी येथे मारुतीच्या पारावर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
सहा वर्षापासून सरकारं कर्जमाफी च्या घोषणा देत आहे, परंतु अद्याप कर्जमाफी झालेली नाही व बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी सरसकट पीक कर्ज अद्याप वाटप केलेले नाही. या मागण्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास पुन्हा 15 ऑगस्ट च्या पुर्वी शेकाप च्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
भाई ॲड. नारायण गोले पाटील, शेकाप माजलगाव
COMMENTS