कु.स्नेहा टाक च्या यशाने कूटूंब झाले भावूक


 


माजलगाव ( प्रतिनिधी)


   श्री.सिद्धेश्वर विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु.स्नेहा सचिन टाक या विद्यार्थिनीने दहावी बोर्ड परीक्षेत ५०० पैकी ४६८ गुण घेऊन ती ९४.२० टक्याने उत्तीर्ण झाल्याबद्दल समजताच तिचे आई - वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.आपल्या मुलीने आपले नाव कमावले असे म्हणून हे कुटुंब भावूक झाले . कु.स्नेहा हिला मराठीमध्ये ९०,संस्कृत ९८,इंग्रजी ९२,गणित ८७, सायन्स९६ ,आणि सोशल सायन्स मध्ये ९२ असे एकूण ४६८ गुण मिळाले.ती ९४.२० टक्याने उत्तीर्ण झाल्याने कु. स्नेहा चे मा.नगरसेवक तुकाराम येवले.खंडुनाना सोनटक्के, अँड विलास राठोड,काँ.शिवाजी कुरे,काँ.शेषराव आबुज,शेख रफिक,मनोज सोनवणे, सिद्धेश्वर येवले,विनायक सोनटक्के,भागवत घुमरे.यांनी अभिनंदन केले


टिप्पण्या