धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोव्हीड सेंटरला 40 हजार रुपये किमतीची वाशिंग मशीन मशिन भेट            

      


धर्माबाद (अहमद लड्डा)- नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांच्या प्रेरणेतून व बाजार समितीचे संचालक तथा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांच्या प्रयत्नातून धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे धर्माबाद येथील कोहीर सेंटरला तब्बल 40 हजार रुपयाची जागतिक स्तरावर नंबर एक समजल्या जाणारी वाशिंग मशीन भेट देण्यात आली.         धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश राव पाटील करखेलीकर यांच्या अथक परिश्रमातून व दूरदृष्टी पणातून बाजार समितीचा न भूतो न भविष्यती असा विकास होऊन बाजार समिती अ वर्गात जाऊन बसली. बाजार समितीचे उत्पन्नही ही वाढले. त्या अनुषंगाने बाजार समितीने विविध सामाजिक, धार्मिक, विकास कामावर जोर देत आपले नाव लौकिक केले .त्याच धर्तीवर बाजार समितीचे संचालक रमेश गौड यांची आमदार राजेश पवार यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समिती वर सदस्यपदी निवड केली. त्या अनुषंगाने रमेश गौड यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देणे चालू केले. धर्माबाद शहरात कोरोना ह्या महामांरीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्याचे पाहून व कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे व त्यांच्यासाठी खाटावरच्या चादरीचे व बेडशीट चे धुलाई करण्यासाठी कोणीच येत नसल्याचे पाहून रमेश गौड यांनी बाजार समितीचे कृतिशील सभापती गणेशराव पाटलांकडे कोवीड सेंटरला वाशिंग मशीन भेट देण्याचा प्रस्ताव ठेवला. लागलीच गणेशराव पाटलांनी त्यास होकार देत सर्व संचालकांचा प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जवळपास सर्वच संचालकांनी या स्तुत्य उपक्रमास एक मताने मान्यता दिली. त्या अनुषंगाने जगात सर्वश्रेष्ठ ठरलेल्या आय. एफ. बी. कंपनीचे 40 हजार रुपये किमतीची वाशिंग मशीन आज कोवीड सेंटरला भेट देण्यात आली.         याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एकबाल शेख ,डॉक्टर लक्ष्मीनारायण केशटवार ,बाजार समितीचे संचालक तथा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड, संचालक दत्ताहरी पाटील आवरे, श्याम शेठ झंवर ,बाजार समितीचे सचिव चंद्रकांत पाटील, सहसचिव वैभव देशमुख, जाधव रोशनगावकर यांच्यासह प्रमुख प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते .                                                           बाजार समितीच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे व ह्या उपकृमास पूर्णत्वास नेणारे रमेश गौड  यांचे शहरात कौतुक होत आहे.


टिप्पण्या