दिंद्रुड/संतोष स्वामी
तेलगाव येथील पञकार बालाप्रसाद जाजु यांची मुलगी कु. सिध्दी जाजु इ.१० बोर्ड परिक्षेत घवघवीत यश मिळवुन उत्तीर्ण झाली आहे. याबद्दल कु.सिध्दीचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
तेलगाव येथील दै.झुंजार नेताचे पञकार बालाप्रसाद जाजु यांची मुलगी कु. सिध्दी ही इयत्ता १०वीला होती.ती तेलगाव येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात होती. कु.सिध्दीने मार्च २०२० मध्ये सरस्वती विद्यालयाच्या परिक्षा केंद्रातुन इ.१० बोर्ड परिक्षा दिली होती. या परिक्षेचा निकाल दि.२९ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या परिक्षेत कु.सिध्दी ८३.४०गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. कु. सिध्दी जाजुने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे दै.झुंजार नेता चे संपादक अजितजी वरपे साहेब,निवासी संपादक श्रीपतीजी माने, डाके मामा, राहुल जामकर,नायब तहसीलदार स्वामी साहेब, जेष्ठ पञकार सुभाषजी वाव्हळ, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर,पर्यवेक्षक चवार सर,आजोबा पांडुरंगजी जाजु, सतिश जाजु, पञकार संतोष स्वामी ,विजयकुमार तोष्णीवाल, राहुल मोटेगावकर, प्रा.कंधारे, आदिसह अनेकांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS