🟣 सेलू (प्रतिनिधी) सेलू तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून दरदिवशी रूग्ण संख्येत वाढ होत आहे.
त्यासाठी तहसील रोड वर असलेल्या कोविड सेंटर मध्ये दाखल झालेल्या बाधित रुग्णांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या आधार देण्याचे कार्य प्रशासनाच्या वतीने दरदिवशी करण्यात येत आहे.रुग्णांच्या दैनंदिन तपासणी व औषधोपचार सह गरम पाणी, रुजकर जेवण, भांडे कपडे धुण्यासाठी साबण आदी व्यवस्था पुरवत दररोज सायंकाळी योगाभ्यास आणि आयुर्वेदिक काढा देण्यात येत आहे यामुळे रुग्णांचे धैर्य वाढत असून संसर्गाची भीती कमी होत आहे.
आज या रुग्णांना व्यवस्थित रित्या जेवण करता यावे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे यांनी स्टील जेवण थाळी,पाणी ग्लास,नाश्ता प्लेट,चमचा देण्यात आले.
कुटुंबप्रमुख म्हणून जी काळजी घरातील प्रमुख व्यक्ती घेत असतो त्याचप्रमाणे बाधित रुग्णांची काळजी डॉ.हरबडे सर घेत आहेत.
*नागरिकांनी तोंडाला रुमाल, शारीरिक अंतर, हात स्वच्छ वारंवार केले तर कोरोना विषाणूची साखळी खंडित करता येऊ शकते यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी व कोरोना विषयी असलेली भीती टाळावी असे आवाहन डॉ.संजय हरबडे यांनी सेलूवासीयांना केले आहे.*
याप्रसंगी नायब तहसीलदार थारकर, डॉ.गिरीश महाजन, डॉ.गोलाईत,गृहपाल गोणारकर,मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर,न.प.कर्मचारी व वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS