आंबुलगा बनले अवैध जुगार मटक्याचे हाॅटस्पाॅट


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) हे गाव बा-हाळी पोलिस चौकी अंतर्गत येत असुन माघिल काही महिन्यापासुन आंबुलगा (बु) येथे अवैध धंदे जुगार मटका तसेच गांज्या विक्रीला उत आला आहे.


गावातील अनेक युवा पिढी या मटक्याच्या आहारी गेलेली आहे.त्यामुळे या तरूणांच्या पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुगार मटका खेळणा-या व्यक्तीच्या चर्चेनुसार दैनंदिन २ ते ३ लाख रूपयाची उलाढाल मटक्यात होत असल्याची चर्चा आहे.आज संपुर्ण देश कोरोनाच्या चिंतेत असताना आंबुलगा (बु) हे गाव जुगार आणि मटक्यात व्यस्त दिसुन येत आहे.त्यामुळे येथिल पोलिस प्रशासन ह्या जुगार मटक्याच्या अवैध धंद्यावर आतातरी कारवाई करतील का ? केवळ नुसती बघ्याची भुमिका घेतील असा प्रश्न या गावातील नागरिकांना पडला आहे..


टिप्पण्या