दशनाम युवक प्रतिष्ठान परभणीची कार्यकारिणी जाहिर*


सोनपेठ/प्रतिनिधी



  • दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीची महत्वपुर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष श्री.संदिप गिरी कान्हेगावकर व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गया निवास,गंगाखेड येथे संपन्न झाली.यामध्ये प्रतिष्ठानच्या विविध पदाधिकारी यांच्या निवडी सर्वानुमते बिनविरोध करण्यात आलेल्या आहेत.यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणुन स्वप्नीलभैया भारती तर सचिव म्हणुन शाम गिरी यांची निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष म्हणुन रामेश्वर भारती,सहसचिव म्हणुन निलेश गिरी,कोषाध्यक्ष म्हणुन सुरेश पुरी यांची निवड केलेली आहे.सदस्य म्हणुन संतोष पुरी,पवन पुरी,प्रविण गिरी,अनुरध भारती,महेश पुरी,अशोक पुरी,दत्ता पुरी.आदी मान्यवरांचा नुतन कार्यकारिणीमध्ये समावेश आहे.तर प्रतिष्ठानचे मार्गदर्शक म्हणुन.गोविंद पुरी,प्रेमप्रकाश भारती,ह.भ.प.माउली महाराज भारती खडकवाडी,प्रताप भारती,बालाजी गिरी,देवगिर गिरी,पुरुषोत्तम पुरी,डाॅ.अशोक बन,गजुभाऊ गिरी पुर्णा,विष्णुपंत पुरी,गणपत भारती,शिवाजी गिरी रुमणेकर,अनिल गिरी,अरुण गिरी कौसडीकर,आदी मान्यवर प्रतिष्ठानचे मार्गदर्शक असतील.वरील नुतन निवडीबद्दल योगेश बन नागपुर,धर्मवीर भारती लातुर,अनिल भाऊ पुरी,लातुर.ह.भ.प.अविनाश भारती,ह.भ.प.अमित महाराज बर्दापुरकर,ह.भ.प.भाऊसाहेब महाराज पंढरपुरकर,सुर्यकांत गिरीगोसावी,सिध्देश्वर गिरी पत्रकार सोनपेठ,राजु भारती नांदेड,महेंद्र पुरी हिंगोली,योगेश बन औरंगाबाद. संपादक ग्लोबल मराठवाडा चे धनराज भारती नांदेड अॅड नरेश भारती पूर्णा तसेच महाराष्ट्रात विविध समाज बांधवानी अभिनंदन करुन पुढिल कार्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत.दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीने आजपर्यंत अनेक सामाजिक,धार्मीक,आर्थिक उपक्रम राबविले आहेत.याअंतर्गत बचत गटांची स्थापना करुन समाजातील गरजुंना अर्थिक मदत उपलब्ध करुन दिलेली आहे.सामाजिक उपक्रमातंर्गत रक्तदान शिबिर घेणे.गंगाखेड गोसावी समाज समाधीधामाचा प्रश्न हाती घेउन तो सर्वांच्या सहकार्यातुन प्रश्न सोडवण्यास झाली आहे.धार्मिक,अध्यात्मिक उपक्रमांतर्गत विविध प्रवचनमाला,किर्तनमाला,व्याख्यानमाला हे उपक्रम लाॅकडाउन कालावधीमध्ये ऑनलाइन फेसबुकद्वारे राबविलेले आहेत.असेच विविध क्षेत्रात भरीव कार्य येणाऱ्या काळात करण्याचा मानस असल्याचे दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीचे संस्थापक अध्यक्ष श्री.संदिप गिरी सर कान्हेगावकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.


टिप्पण्या