- महावितरणकडे स्वतंत्र ट्रान्सफार्मरची मागणी करूनही दुर्लक्ष
माजलगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील छत्रबोरगांव ह्या गावात महावितरण कडून गाव उजेडात अन् दलित वस्ती मात्र अंधारात असाच काहीसी दुजाभाव दिसून येत आहे. दलित वस्तीतील ग्रामस्थांनी वारंवार महावितरणकडे स्वतंत्र ट्रान्सफार्मरची मागणी केली परंतू महावितरणकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने आत्ता ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत छत्रबोरगाव येथील 33/11 के.व्ही. उपकेंद्र बंद पाडण्याचा इशारा निवेदनाव्दारे उपकार्यकारी अभियंता यांना गुरूवारी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रबोरगाव येथील दलित वस्तीमध्यील नागरिकांचे विजपुरवठा बंद आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यावर दलित वस्तीतील ग्रामस्थांनी वारंवार तोंडी व निवेदनावदारे महावितरणकडे स्वतंत्र ट्रान्सफार्मर देवून अंधार दुर करावा अशी मागणी केली आहे. परंतू मागील दि.26 जुन 2020 पासून दलित वस्ती अंधारात अन् गाव उजेडात अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे संतापलेल्या छत्रबोरगाव येथील दलित वस्तीतील ग्रामस्थांनी तात्काळ स्वतंत्र ट्रान्सफार्मर उपलब्ध करून विज पुरवठा सुरू करावा. अन्यथा छत्रबोरगाव येथील 33/11 के.व्ही. उपकेंद्र बंद करून दि.27 जुलै 2020 रोजी अमरण उपोषण करण्याचा इशारा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्यासह मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, सामाजिक न्यायमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे वचिष्ट लांडगे, तुकाराम गायकवाड, बापुराव पाटोळे, बाबासाहेब पांजणे, प्रकाश कदम, बळीराम व्यकुरे, सुंदर कसबे, अमोल साळवे, देविदास घुंगासे, तुकाराम कचरे, आण्णासाहेब वाघमोडे, कैलास निसर्गंध आदींसह शेकडो ग्रामस्थांनी दिला आहे.
COMMENTS