सामाजिक अंतर ठेवून वृक्ष लागवड संपन्न


 


धर्माबाद (अहमद लड्डा ) येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) धर्माबाद जिल्हा नांदेड येथे आज दिनांक 21जुलै 2020 वार मंगळवार रोजी सामाजिक अंतर ठेवून वृक्ष लागवड करण्यात आली आसल्याची माहीती उपरोक्त संयोजकांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिली. 


वृक्ष लागवड व संवर्धन आणी स्तोत्र मंत्र पठण हा विश्वस्तरीय उपक्रम गिनीज लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. असल्यामुळे केंद्रातील 4 ते 5 सेवेकरी यांच्या वतीने छोटेखाणी वर्ष पूर्ती सोहळा( वृक्ष वाढदिवस) आयोजित करून एक अदभुत अविस्मरणीय क्षण (सोहळा) सामाजिक अंतर ठेवून वृक्ष लागवड ही काळाची गरज समजून वृक्ष वल्ली आम्हा सोयरी या म्हणी प्रमाणे साजरा करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एक चांगला संदेश केंद्राच्या वतीने देण्यात आला. या कार्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलीचा आदेश व आदरणीय नितीन भाऊचे मार्गदर्शन वारंवार बालसंस्काराच्या माध्यमातून नेहमी लाभत असते. या केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल शहरात सेवेकरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


टिप्पण्या